शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

होमगार्ड घालणार सर्वच निवडणुकांवर बहिष्कार; गृहमंत्र्यांना निवेदन

By विजय.सैतवाल | Updated: October 8, 2023 14:35 IST

आझाद मैदानावरील आंदोलनानंतरही दखल नाही

जळगाव : होमगार्डच्या विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेले उपोषण आमदार मंगेश चव्हाण यांची मध्यस्थी व मंत्री गिरीश महाजन यांच्या आश्वासनानंतर सोडण्यात आले. मात्र त्याला आता सव्वा महिना उलटला तरी मागण्यांविषयी घेण्यात येणारी बैठक झाली नाही की मागण्यांचा विचार होत नसल्याने आगामी सर्वच निवडणुकांवेळी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा राज्यातील सर्व होमागार्डनी दिला आहे. या संदर्भात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे.

३६५ दिवस नियमित रोजगारासह इतर विविध मागण्या होमगार्डकडून केल्या जात आहे. त्यासाठी वेळोवेळी निवेदन देण्यासह आंदोलन करण्यात आले. यात ७६ वर्षांच्या इतिहासात होमगार्ड हा तूटपुंजा मानधनावर सेवा देत आहे, असे होमगार्डचे म्हणणे आहे. होमगार्ड स्वतःवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात तसेच नियमित ३६५ दिवस रोजगार मिळावा, यासाठी ते लढा देत आहे. त्याच पार्श्वभूमीवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठीच मुंबई येथे आझाद मैदानावर महाराष्ट्र राज्य होमगार्ड महासंघाच्या नेतृत्वात २१ ते २९ ऑगस्ट दरम्यान होमगार्डनी आंदोलन केले होते.

त्या वेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पुढील दहा दिवसात गृहमंत्र्यांशी बोलून संयुक्त भेट घालून होमगार्डना ३६५ दिवस नियमित रोजगारसह इतर २० मागण्यांवर चर्चा करण्यासंदर्भात बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले होते. त्या वेळी त्यांनी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्याशी फोनवरदेखील बोलणे करून दिले होते व त्यांनीही बैठक घेण्याविषयी सांगितले होते. त्यामुळे होमगार्डनी उपोषण तात्पुरते स्थगित केले. मात्र, अद्यापही गृहमंत्र्यांसोबतची बैठक झालेली नाही.

होमगार्डसह कुटुंब मतदान करणार नाहीमागण्यांसंदभात १५ ऑक्टोबरपूर्वी बैठक घ्यावी, अशी मागणी होमगार्डनी केली आहे. बैठक न झाल्यास होमगार्ड बहिष्कार आंदोलन करणार आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातील एक हजार ९०० होमगार्डसह राज्यातील ४५ हजार ७२४ होमगार्ड, त्यांचे कुटुंब व मित्र परिवार आगामी सर्वच निवडणुकांवेळी मतदानावर बहिष्कार टाकणार आहे, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

न्याय हक्कासाठी लढाहोमगार्डच्या विविध मागण्यांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्ष केले जात आहे. आतादेखील मागण्यांसंदर्भात लवकरात लवकर बैठक होऊन मागण्या मान्य न झाल्यास आगामी सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यात येणार आहे. - डॉ. प्रतापराव मोहिते पाटील, व्यवस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य होमगार्ड महासंघ.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस