शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांच्या गैरसोयीबाबत गृह विभागाला जाग

By admin | Updated: July 14, 2014 03:33 IST

कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या दोषी व कच्च्या कैद्यांच्या आवश्यक सुविधांबाबत दक्ष असणाऱ्या गृह विभागाला आता त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या गैरसोयीबाबत जाग आली आहे

जमीर काझी, मुंबईकारागृहात शिक्षा भोगणाऱ्या दोषी व कच्च्या कैद्यांच्या आवश्यक सुविधांबाबत दक्ष असणाऱ्या गृह विभागाला आता त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या गैरसोयीबाबत जाग आली आहे. राज्यभरातील विविध २६ लहान-मोठ्या तुरुंगांमध्ये ४७ नवीन स्वच्छतागृहे बांधण्यात येणार असून, त्यासाठी तब्बल ५० लाख ६५ हजारांवर निधी मंजूर करण्यात आला आहे. गेल्या ९ महिन्यांपासून त्याच्या प्रस्तावाची फाईल गृह विभागाकडे प्रलंबित होती.राज्यात एकूण विविध प्रकारची ४७ कारागृहे असून, त्या ठिकाणी सुमारे एक हजारावर महिला कार्यरत आहेत. दुरवस्थेतील स्वच्छतागृहाबाबत कित्येक वर्षांपासून तक्रार केली जात असल्याचे गृह विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले. गँगस्टर अबू सालेमवर गेल्या वर्षी तळोजा कारागृहामध्ये छोटा राजन टोळीतील गुंडांकडून गोळीबार करण्यात आला होता. त्या वेळी जेलमधील अंतर्गत सुरक्षा व्यवस्था चव्हाट्यावर आल्यानंतर गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी गेल्या वर्षी ३० जुलैला कारागृह विभागाच्या आढाव्याबाबतची बैठक घेतली होती. त्यामध्ये महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठीच्या स्वच्छतागृहाच्या दुरवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला असताना, त्यावर नवीन बांधकामासाठी प्रस्ताव पाठविण्याची सूचना करण्यात आली होती. त्यानुसार तुरुंग विभागाच्या प्रमुख मीरा बोरवणकर यांनी राज्यभरातील मध्यवर्ती, जिल्हा व कारागृहांच्या परिस्थितीचा आढावा घेऊन २६ जेलमध्ये ४७ नवीन स्वच्छतागृहे बांधणे अत्यावश्यक असल्याबाबतचा प्रस्ताव गेल्या वर्षी ३१ आॅक्टोबरला गृह विभागाकडे पाठविला होता. त्याबाबत पाठपुरावा करूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष करण्यात येत होते.