शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

गृह विभागाच्या परिपत्रकाने खळबळ

By admin | Updated: September 5, 2015 01:38 IST

केंद्र अथवा राज्य सरकारवरील टीका हा देशद्रोह मानला जाईल, अशा आशयाचे परिपत्रक गृह विभागाने काढल्यावरून सोशल मीडिया आणि विरोधी पक्षांनी सरकारवर टीकेची झोड उठवली

मुंबई : केंद्र अथवा राज्य सरकारवरील टीका हा देशद्रोह मानला जाईल, अशा आशयाचे परिपत्रक गृह विभागाने काढल्यावरून सोशल मीडिया आणि विरोधी पक्षांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. मात्र पत्रकात ‘तसे’ काहीही नसल्याचे सांगत परिपत्रक रद्द न करण्याची भूमिका राज्य शासनाने घेतली आहे. राजकीय व्यंगचित्रकार अमीम त्रिवेदी यांच्यावर भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १९(१)(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र हे कलम व्यक्तीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणते. त्यामुळे भविष्यकाळात अशा प्रकारची कारवाई पोलिसांकडून होऊ नये म्हणून न्यायालयाने हस्तक्षेप करावा, यासाठी संस्कार मराठे यांंनी महाराष्ट्र शासनाविरुद्ध याचिका दाखल केली होती. त्यावर यासंदर्भात पोलिसांना मार्गदर्शक तत्त्वे परिपत्रकाद्वारे जारी करण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. त्यानुसार गृह विभागाने २७ आॅगस्ट रोजी परिपत्रक जारी केले आहे. मात्र या परिपत्रकावर टीकेची झोड उठल्यानंतर गृह विभागाने खुलासा केला असून, कायदेशीर मार्गाने नापसंती व्यक्त करण्यासाठी केलेली टीका भारतीय दंडसंहितेच्या कलम १२४ (क) देशद्रोह म्हणून गणली जाऊ नये, असा स्पष्ट उल्लेख परिपत्रकात असून, ते उच्च न्यायालयाच्या सूचनेस अनुसरूनच काढले असल्याचे म्हटले आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील सरकारच्या परिपत्रकावर टीका करताना म्हणाले की, उच्च न्यायालयाने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारी कोणतीही भूमिका घेतलेली नव्हती. असे असताना सरकारने न्यायालयाच्या सूचनांचा श्लेष काढून अशी गदा आणणारे परिपत्रक काढले आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या परिपत्रकाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा इशारा दिला आहे. हे परिपत्रक रद्द करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून केली. पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीनेही परिपत्रक रद्द करण्याची मागणी केली आहे. (विशेष प्रतिनिधी)