शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘होम डिलेवरी’ वेश्या व्यवसायातील नवीन ट्रेंड

By admin | Updated: July 4, 2016 09:24 IST

वेश्या व्यवसायाचे अड्डे चालविण्याचा काळ मागे पडला असून आता वेश्या व्यवसायासाठी युवती गि-हाईकांना घरपोच पोहोविण्याची नवी पद्धत सर्रासपणे सुरू झाली आहे.

ऑनलाइन लोकमत
पणजी : वेश्या व्यवसायाचे अड्डे चालविण्याचा काळ मागे पडला असून आता  वेश्या व्यवसायासाठी युवती गि-हाईकांना घरपोच पोहोविण्याची नवी पद्धत सर्रासपणे सुरू झाल्याचे पोलीसांच्या अलीकडच्या कारवायांतून स्पष्ट झाले आहे. गि-हाईकांना घरपोच म्हणजेच त्यांना हव्या असलेल्या ठिकाणी  युवतींना पोहोचविण्याचे काम दलाल करीत आहेत. 
 
वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यांवर छापे टाकण्याचे प्रमाण वाढल्यामुळे असे अड्डे चालविणे जोखमीचे आहेत याची जाणीव वेश्या दलालांना झाली आहे. त्यामुळे वेश्या व्यवसाय सोडला नाही तर वेश्या व्यवसायाची पद्धत बदलण्यात आली आहे. गि-हायिकांशी आॅन लाईन संपर्क यापूर्वीही चालू होता, परंतु हा संपर्क झाल्यानंतर गि-हायिकांना अड्ड्याचा पत्ता सांगण्याऐवजी गि-हायिकांचा पत्ता दलालांकडून घेतले जातात. त्यानंतर त्यांना सोयीच्या ठिकाणी युवतींना पोहोचविले जाते. त्यासाठी ट्युरीस्ट टॅक्सींचा वापर केला जात आहे.
 
बोगस ट्युरीस्ट गाईड्स या कामात महत्त्वाची भुमिका बजावत असतात. गिºहायिक आपली सोयीची जागा ठरविताना भाड्याचा फ्लॅट किंवा एखाद्या लॉजिंगमधील खोलीचा पत्ता सांगतो.  अधिक गिºहायिक हे गोव्यात पर्यटक म्हणून येणारे लोक असतात. त्यामुळे अशा लोकांसाठी भाड्याच्या खोलींची व्यवस्थाही दलालाकडूनच केली गेल्याचे प्रकारही आढळून आले आहेत. 
पोलिसांनी सलग केलेल्या कारवाईमुळे वेश्या व्यवसायाला थोडा वचक बसला आहे.
 
दलालांनी पद्धती बदलल्या असल्या तरीही पोलिसांचे त्यावर लक्ष्य आहे असे गुन्हा अन्वेषण विभागाचे अधीक्षक कार्तिक कश्यप यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. कुठेही असे संशयित प्रकार सुरू असल्यास पोलिसांना त्याची माहिती द्यावी, त्वरित कारवाई केली जाईल  असेही ते म्हणाले. 
 
पोलीस प्रशासनाकडून घेतलेल्या निर्णयानुसार वेश्या व्यवसायाविरुद्धच्या काराया ह्या सातत्याने करण्याची सूचना सर्व पोलीस स्थानके आणि गुन्हा अन्वेषण विभागाला गेल्या आहेत. गुन्हा अन्वेषण विभागाने  तर या बाबतीत कारवायांचा धडाका लावताना कळंगूट, पर्वरी, मिरामार, हणजुणे या भागात धडाधड छापे टाकले. या छाप्यातून अनेक दलालांना पकडण्यात आले आणि युवतींची सुटका करण्यात आली.
 
एखाद्या ठिकाणी सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यावर गुन्हा अन्वेषण विभागाकडून छापा टाकण्यात आला तर संबंधित पोलीस स्थानकाने या प्रकरणात का कारवाई करण्यात आली नाही याचे स्पष्टीकरण त्या पोलीस स्थानकाच्या  प्रमुखाला आपल्या वरिष्ठांना द्यावा लागतो. त्यामुळे पोलीस स्थानकेही सतर्क झाली आहेत. त्यामुळे वेश्याव्यवसायाचे अड्डे चालविण्यापेक्षा घरपोच युवती पाठविणे हे त्यांना सोयीस्कर वाटत आहे.