शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

हॉलीडे’, फिल्मीस्तान’ चित्रपट हिट

By admin | Updated: June 9, 2014 23:13 IST

अनेक दिवसांनी एकाच दिवशी प्रदर्शित झालेले दोन चित्रपट हिट ठरण्याचा फॉम्यरुला या वेळी घडला. या वेळी ‘हॉलीडे’ आणि ‘फिल्मीस्तान’ हे दोन वेगळ्या धाटणीचे चित्रपट प्रदर्शित झाले.

अनेक दिवसांनी एकाच दिवशी प्रदर्शित झालेले दोन चित्रपट हिट ठरण्याचा फॉम्यरुला या वेळी घडला. या वेळी ‘हॉलीडे’ आणि ‘फिल्मीस्तान’ हे दोन वेगळ्या धाटणीचे चित्रपट प्रदर्शित झाले. चित्रपटांच्या कथा खूप वेगळ्या असल्याने त्यांच्यात तशी स्पर्धाही नव्हती. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी पसंतीची पावती दिलेली आहे. त्यांची कमाईही चांगली झाली आहे. तर त्याआधी प्रदर्शित झालेल्या टायगर श्रॉफच्या ‘हीरोपंती’ चित्रपटाने 5क् कोटींचा गल्ला पार करण्यात यश मिळवले आहे. 
अक्षय कुमारच्या ‘हॉलीडे’ चित्रपटाविषयी बोलायचे झाल्यास, 7क् कोटी बजेटमध्ये हा चित्रपट तयार झाला होता. एकाच वेळी 4क् हजार प्रिंट्समध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने तीन दिवसांत 4क् कोटींच्या आसपास कमाई केली आहे. अक्षयच्या मागील चित्रपटांच्या तुलनेत या चित्रपटाने केलेला व्यवसाय जास्त चांगला असल्याचे सांगितले जात आहे. 
‘हॉलीडे’बरोबर प्रदर्शित झालेल्या ‘फिल्मीस्तान’ चित्रपटाविषयीही खूप उत्सुकता होती. 2क्12मध्ये हा चित्रपट तयार झाला होता. मात्र कोणताही मोठा कलाकार नसल्याने प्रदर्शन होण्यास विलंब होत होता. उत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार, तसेच आंतरराष्ट्रीय पारितोषिकेही या चित्रपटाच्या नावे आहेत. भारत-पाकिस्तान संबंधावर वेगळ्या अंगाने बनलेल्या या चित्रपटाचे बजेटही 1 कोटीपेक्षा कमी होते. ते तीन दिवसांतच वसूल करत चित्रपटाने 2.75 कोटींची दमदार बाजी मारली. 
या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत  असला तरी अक्षय कुमारच्या ‘हॉलीडे’बद्दल मात्र लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत. चित्रपट पाहून अनेक जण निराशही झाले. तर फिल्मीस्तान चित्रपटाविषयी उत्तम प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत. त्यामुळे त्याचा सकारात्मक परिणाम चित्रपटावर झाला. या दोन्ही चित्रपटांना मिळालेला प्रतिसाद बघता बॉलीवूडमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. 
गेल्या काही चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास, टायगर श्रॉफच्या ‘हीरोपंती’ चित्रपटाने अपेक्षेप्रमाणो 52 कोटींच्या आसपास कमाई केली आहे. तर हंसल मेहतांच्या ‘सिटीलाइट्स’ चित्रपटाने एकूण 1क् दिवसांत फक्त 6.8क् कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे चित्रपटाला सरासरी प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर प्रदर्शित झालेल्या ‘कुकु माथुर की झंड हो गई ’ हा चित्रपट पहिल्याच दिवशी आपटला. 
येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणा:या चित्रपटांपैकी ‘फुगली’ चित्रपटाविषयी जास्त आकर्षण आहे. शहरातील मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट बघणा:या तरुणाईसाठी हा चित्रपट तयार केला गेला आहे. ऑलिम्पिक विजेता बॉक्सर विजेंदर सिंग या चित्रपटापासून बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. त्याचबरोबर मोहित मारवाहा, कियारा आडवाणी आणि जिमी शेरगिलही प्रमुख भूमिकेत आहेत.