शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

राज्य अर्थसंकल्पाची करणार होळी

By admin | Updated: March 28, 2016 02:11 IST

राज्यात दुष्काळ असतानाही राज्याच्या अर्थसंकल्पात सरकारने सामाजिक सेवांना कात्री लावल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी केला आहे. परिणामी सरकारविरोधातील

मुंबई : राज्यात दुष्काळ असतानाही राज्याच्या अर्थसंकल्पात सरकारने सामाजिक सेवांना कात्री लावल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी केला आहे. परिणामी सरकारविरोधातील रोष व्यक्त करण्यासाठी ३१ मार्चला जगण्याचा हक्क आंदोलनांतर्गत राज्यभर अर्थसंकल्पाची होळी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.महाजन म्हणाल्या की, २०१६-१७ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात पोषण, आरोग्यसेवा, रेशन, शिक्षण, पेन्शन यांसारख्या सामाजिक सेवांच्या निधीत कपात करण्यात आली आहे. राज्यातील अंगणवाड्या तर सरकार बंद करण्याच्या मार्गावर असल्याचे दिसते. कारण गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मुलांच्या पोषणासाठीची तरतूद तब्बल ६२%ने कमी केली. यावरून कुपोषणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार गंभीर दिसत नाही. अंगणवाड्या बंद झाल्यास लाखो लहान मुले कुपोषणाच्या विळख्यात जातील. शिवाय निधी कपातीमुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या नोकरीवरही कपातीची टांगती तलवार लटकत असल्याचे त्यांनी सांगितले.परिणामी प्रत्येक तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अर्थसंकल्पाची होळी करून सामाजिक संघटना सरकारचा निषेध व्यक्त करणार आहेत. शिवाय राज्यातील प्रत्येक मतदारसंघातील आमदाराला भेटून संघटनेचे प्रतिनिधी याबाबत विधिमंडळात आवाज उठवण्याचे आवाहन करणार आहेत.आरोग्य अभियानच आजारी!२०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी ग्रामीण आरोग्य अभियानाच्या निधीत तब्बल ३५% ने कपात केलेली आहे. त्यामुळे अनेक कंत्राटी कामगारांवर, नर्सेसवर संक्रांत येण्याची शक्यता आहे.५६% ने सर्व शिक्षा अभियानाच्या निधीतही कपात करण्यात आली आहे. त्याचा सर्वाधिक फटका दलित, आदिवासी आणि ग्रामीण-शहरी गरीब विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता संघटनेने व्यक्त केली.उद्योगपतींवर मेहेरबानी कशाला ?सरकारने उद्योगपतींकडून कर पूर्णपणे वसूल केला तर राज्यात सगळ्यांसाठी सामाजिक सेवा व सुरक्षेच्या योजनांसाठी पुरेसा निधी सरकारकडे उपलब्ध झाला असता. मात्र उद्योगपतींवर सरकारने एवढी मेहेरबानी का दाखवली, असा सवाल संघटनेने उपस्थित केला आहे.अन्न सुरक्षा कायद्याचा बोजवारा ?केशरी कार्डधारकांना स्वस्त रेशन देण्यासाठी सरकारकडे कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त निधी नाही. १४ दुष्काळी जिल्ह्यांत सर्वांना रेशनवर अन्नधान्य उपलब्ध करून देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणाही त्यामुळे केवळ धूळफेक असल्याचे स्पष्ट झाले आहे.