शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या नोटिसांची मोदींच्या गावात होळी

By admin | Updated: April 16, 2017 02:55 IST

शासनाच्या धोरणामुळे जगाचा पोशिंदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे़ दुष्काळामुळे आर्थिक अडचणीत असताना शेतकऱ्यांना

तुळजापूर (जि. उस्मानाबाद) : शासनाच्या धोरणामुळे जगाचा पोशिंदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे़ दुष्काळामुळे आर्थिक अडचणीत असताना शेतकऱ्यांना वीजबिल, बँकेच्या नोटीसा दिल्या जात आहेत़ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडनगर गावातच या नोटीसांची होळी करणार आहे, असे आ़ बच्चू कडू यांनी सांगितले.शेतकरी संघटना, प्रहार संघटनेच्या वतीने काढण्यात आलेली ‘सीएम टू पीएम’ आसूड यात्रा शुक्रवारी तुळजापूर शहरात आली़ या यात्रेचे तुळजापूरकरांनी जोरात स्वागत केले़ यानिमित्त आयोजित जनता दरबारात आ़ कडू बोलत होते़ यावेळी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ पाटील, प्रहार संघटना, शेतकरी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. नरेंद्र आणि देवेंद्र सरकार जाहिरनाम्यातील आश्वासनांकडे दुर्लक्ष करून काम करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने वाईट दिवस आलेले आहेत. मोठ्या उत्साहाने आपण काँग्रेसला घालवले. आम्ही सत्तेवर आलो तर उत्पादन खर्चापेक्षा ५० टक्के नफा देवू, अशाप्रकारची मोठी आश्वासने त्यांनी दिली. परंतु यापैकी काही झाले नाही. उलट शेतकरी आत्महत्या वाढत आहेत, असे रघुनाथ पाटील यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)शेतकऱ्यांनो, आरपारच्या लढाईत सहभागी व्हा!सत्ता आली की व्यापारी आणि सत्ता गेली की सरकारला शेतकरी दिसतो. सातवा वेतन आयोग जाहीर करून १६ लाख कर्मचाऱ्यांना पावणेदोन लाख कोटी रुपये देण्याचे नियोजन होते. परंतु, कर्जबाजारी होऊन आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत देण्यास किंवा कर्जमाफी करण्यास सरकारकडे पैसे नाहीत. शेतकऱ्यांसाठी आम्ही आता ही आरपारची लढाई लढत असून, यात सहभागी व्हावे, असे आवाहन बच्चू कडू यांनी विटा (सांगली) येथे केले.