शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

हिवरेबाजारला ग्रामीण पर्यटन केंद्र

By admin | Updated: May 30, 2016 04:40 IST

शास्रशुद्ध माहिती देणाऱ्या राज्यातील पहिल्या ग्रामीण पर्यटन केंद्राचे १ जून रोजी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे़

अहमदनगर : केंद्र व राज्य सरकारच्या पर्यटन विकास योजनेतून आदर्शगाव हिवरेबाजार येथे उभारण्यात आलेल्या आणि शास्रशुद्ध माहिती देणाऱ्या राज्यातील पहिल्या ग्रामीण पर्यटन केंद्राचे १ जून रोजी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे़ या केंद्रात हिवरेबाजार येथे गेल्या तीन दशकात केलेल्या उपक्रमांची व नावीन्यपूर्ण कामांची माहिती विविध भाषेत पर्यटकांना मिळणार आहे. यात स्लाईड शो व संवाद केंद्राचाही समावेश आहे.हिवरेबाजारने सुरुवातीपासून गावात लोकसहभागातून कशा पद्धतीने कायापालट करून दुष्काळावर मात केली आहे, येथील पाण्याचा ताळेबंद तसेच जलसंधारणचे महत्वाकांक्षी काम, श्रमदानातून केलेली कामे आदींबाबत माहिती घेण्यासाठी देशभरातून हजारो अभ्यासक व पर्यटक हिवरेबाजारला भेट देत असतात. केंद्र व राज्य सरकारने येथे ग्रामीण पर्यटन केंद्र सुरु केले आहे. (तालुका प्रतिनिधी)>नाश्ता अन् दुपारचे जेवण राजभवनातच जिल्ह्यातील ‘जलयुक्त’ची कामे करणाऱ्या २७९ गावांतील सरपंचांना १ जून रोजी हिवरेबाजार येथे दुष्काळस्थितीवर चर्चासत्रासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. राज्यात दुष्काळ असल्याने या दौऱ्यात राज्यपाल सकाळचा नाश्ता राजभवनात घेणार असून हिवरेबाजारची भेट संपल्यानतर दुपारच्या जेवणासाठी परत राजभवन येथे जाणार आहेत.