शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

औषधांअभावी एचआयव्ही रुग्णांचा जीव धोक्यात! ई- टेंडरिंगमध्ये रखडली औषध खरेदी प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 03:15 IST

थर्ड लाईन औषधांसाठी एआरटीचे सहा केंद्रे

प्रवीण खेतेअकोला : देशभरात एचआयव्हीच्या थर्ड लाईन औषधांचा तुटवडा असून, त्याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रासह तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशातील रुग्णांना बसत आहे. राज्यात थर्ड लाईन औषधांसाठी एआरटीची केवळ सहा केंद्रे असून, येथे रुग्णांना सात ते आठ गोळ््याच दिल्या जात आहेत. नॅशनल एड्स कंट्रोल आॅर्गनाईझेशनने (नॅको) एचआयव्हीचे औषध जिल्हास्तरावरच खरेदीचे निर्देश दिले आहेत. मात्र, ई-टेंडरींगची प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे दीड महिन्यांपासून राज्यात एचआयव्हीच्या थर्ड लाईन औषधांचा तुटवडा आहे.

एचआयव्ही रुग्णांसाठी राज्यभरात ‘अ‍ॅन्टी रिट्रोव्हायरल थेरपी’ (एआरटी) केंद्र सेवा देत आहेत. या ठिकाणी एचआयव्हीच्या रुग्णांना गरजेनुसार फस्ट , सेकंड आणि थर्ड लाईन औषधे दिली जातात. परंतु, वर्षभरापासून औषधांचा तुटवडा आहे. त्यामुळे रुग्णांना दोन महिन्यांऐवजी केवळ दहा ते पंधरा दिवसांची औषधे दिली जात आहेत. नॅशनल एड्स कंट्रोल आॅर्गनायझेशनच्या (नॅको) निर्देशानुसार, एआरटी केंद्रांना स्थानिक स्तरावरच औषध खरेदीबाबत सूचना देण्यात आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.

राज्यात मुंबई, पुणे, औरंगाबाद, सोलापूर, अकोला येथील एआरटी केंद्रांवरच थर्ड लाईन औषधांचा पुरवठा केला जातो. मात्र, येथील औषध साठा दीड महिना पुरेल एवढाच असल्याची माहिती संंबधित अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.एकाचा झाला मृत्यूऔषधांअभावी तमिळनाडूतील तंबरम (जिल्हा कद्दुलोर) येथील एका रुग्णाचा शनिवारी मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती अकोल्यातील विहान संस्थेतर्फे देण्यात आली आहे.

टॅग्स :HIV-AIDSएड्स