शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

बालीका एचआयव्ही बाधित प्रकरण;  आरोग्यमंत्र्यांनी घेतली दखल; चौकशीचे आदेश जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 17:50 IST

Rajesh tope orders enquiry : आठ महिन्याच्या चिमुकलीला संक्रमित रक्त चढवल्याने ती एचआयव्ही बाधित झाली हे वृत्त सर्व प्रथम १ अॉगष्ट 'लोकमत'ने प्रकाशित केले.

-संजय उमक

मूर्तिजापूर : तालुक्यातील हिरपुर येथील एका आठ महिन्याच्या चिमुकलीला संक्रमित रक्त चढवल्याने ती एचआयव्ही बाधित झाली हे वृत्त सर्व प्रथम १ अॉगष्ट 'लोकमत'ने प्रकाशित केले. या गंभीर बाबीची दखल घेत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दखल घेऊन या प्रकरणी चौकशीचे आदेश जारी केले आहेत.         तालुक्यातल्या हिरपूर येथील एका आठ महिन्याच्या चिमुकलीला एचआयव्ही संक्रमित व्यक्तीचे रक्त दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला या प्रकरणी पीडित चिमुकलीच्या नातेवाईकांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे बुधवारी तक्रार दाखल केली व 'लोकमत'ने त्याच दिवशी वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर या प्रकरणाची आरोग्य विभागाने गंभीर दखल घेतली असून याची चौकशी सुरू करण्यात आली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालना येथे माध्यमांशी बोलताना दिली.  ते म्हणाले की, या बाबत अतिशय गंभीर दखल घेतली आहे. एका लहान मुलीला पांढऱ्या पेशी कमी झाल्याने रक्त देण्यात आलं होतं यासंदर्भात फुड ड्रग्ज अथारिटी (एफडीए) व स्थानिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना सुचित करून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत येत्या दोन तीन दिवसात त्याचा अहवाल प्राप्त होईल त्या नुसार कारवाई केल्या जाईल. ब्लड बँकेने रक्तदात्याकडून रक्त घेताना एचआयव्ही टेस्ट करुन रक्त स्विकारणे आवश्यक होते त्याच बरोबर ज्या खासगी रुग्णालयात त्या बालीकेचा उपचार सुरु होता त्या रुग्णालयाने रक्ताची सॅम्पल टेस्ट करणे आवश्यक होते यात हलगर्जीपणा झाल्याचे दिसून येते याची पुर्ण चौकशी करु कठोर कारवाई करण्यात येईल.----------------------असे आहे प्रकरण 

हिरपुर येथील एका आठ महिन्याच्या बालीकेला येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी पांढऱ्या पेशी कमी असल्याचे सांगून अकोला येथील बी पी ठाकरे रक्त पेढी मधून पांढरे रक्त बोलावण्यात आले परंतु ते रक्त एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याने आठ वर्षांच्या निष्पाप बालीकेलाही एचआयव्ही संक्रमित व्हावे लागले. यासंदर्भात चिमुकलीच्या पित्याने आरोग्य मंत्र्यांसह विविध ठिकाणी न्याय मागीला आहे.  रक्तपेढीसह डॉक्टर होणार कारवाई

या प्रकरणी रक्त दात्याकडून रक्त घेणारी रक्तपेढीसह त्या चिमुकलीला उपचारा दरम्यान रक्त चढविणाऱ्या मूर्तिजापूर येथील डॉ. प्रशांत अवघाते यांच्यावरही कारवाई होणार असल्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. यात रक्तपेढी व रक्त चढविणारे डॉक्टर तेवढेच दोषी असल्याचे बोलल्या जाते

टॅग्स :Rajesh Topeराजेश टोपेAkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूर