शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत पुन्हा 'हिट अँड रन' - भरधाव कारने ५ जणांना चिरडले

By admin | Updated: January 22, 2016 12:21 IST

मस्जिद बंदरच्या क्रॉफर्ड मार्केटजवळ एका भरधाव वेगाने येणा-या गाडीने फूटपाथवरील ५ नागरिकांना चिरडल्याने मुंबई आज पुन्हा हिट अँड रन प्रकरणाने हादरली.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ - आज पहाटे मुंबई पुन्हा 'हिट अँड रन' प्रकरणाने हादरली, मस्जिद बंदरच्या क्रॉफर्ड मार्केटजवळ एका भरधाव वेगाने येणा-या गाडीने फूटपाथवरील ५ नागरिकांना चिरडले असून दोघांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारचालक आमिन युसूफ खान याला अटक केली असून तो बीएमसीमधील कंत्राटदार असल्याची माहिती समोर येत आहे. काल रात्री ५ जणांना चिरडल्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला होता. या प्रकरणी पायुधीन पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
अनेक मुंबईकरांप्रमाणे काल रात्रीही एक कुटुंब मस्जीद बंदरच्या क्रॉफर्ड मार्केटजवळील मोहम्मद अली रोडवरील फूटपाथवर झोपले असताना एक अज्ञात कारचालक भरधाव वेगाने गाडी चालवत आला आणि नियंत्रण सुटल्याने कार फूटपाथवर चढली. या घटनेत चार महिलांसह एक मुलगा जखमी झाला असून दोघींची प्रकृती अतीशय गंभीर आहे. सर्व जखमींवर जे. जे. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
आज झालेल्या या घटनेमुळे फूटपाथवर झोपणाऱ्यांच्या सुरक्षेतेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. 
 
हिट अँड रनच्या काही गाजलेल्या घटना -
 
 
- अभिनेता सलमान खान :
 
२८ सप्टेंबर २००२ हिट अँड रन प्रकरण घडले. सलमानने लँड कु्रझर गाडी भरधाव चालवत वांद्रे येथील अमेरिकन एक्सप्रेस बेकरीजवळील फुटपाथवर चढवली. फुटपथावर झोपलेले पाच जण गाडीखाली चिरडले गेले. यातील एकाचा बळी गेला. याप्रकरणी सलमानविरोधात वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयात भरधाव गाडी चालवण्याचा खटला सुरू होता. मात्र २००३ मध्ये सलमानवर सदोष मनुष्यवधाचा आरोप ठेवण्यात आला व हा खटला सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आला. तेथे त्याला ५ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. मात्र या शिक्षेच्या विरोधात सलमानने मुंबई उच्च न्यायालयात अपील केले असता सबळ पुराव्याअभावी सलमानची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
 
- संजीव नंदा (नवी दिल्ली) : २ वर्षे कैद व समाजसेवा
आरोपी- संजीव नंदा, निवृत्त नौदलप्रमुख एस. एम. नंदा यांचा नातू
घटना दिनांक- १० जानेवारी १९९९
मद्यधुंद अवस्थेत सुसाट वेगाने बीएमडब्ल्यू मोटार चालविल्याने दिल्लीत लोधी रोडच्या चौकात तीन पोलिसांसह एकूण सहा जणांचा चिरडून मृत्यू. 
घटनेनंतर १० वर्षांनी सुरुवातीस निर्दोष मुक्तता.
जनक्षोभानंतर खटल्याची फेरसुनावणी. त्यात तीन वर्षांचा कारावास.
२०१२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा कमी करून दोन वर्षे केली. त्याशिवाय मोठा दंड आणि दोन वर्षे समाजसेवा करण्याचा आदेश
 
- अ‍ॅलिस्टर परेरा (मुंबई) :
आरोपी- अ‍ॅलिस्टर अ‍ॅन्थनी परेरा. उद्योगपतीचा मुलगा.
घटनेचा दिनांक-१२ नोव्हेंबर, २००६
मद्यधुंद अवस्थेत सुसाट वेगाने टोयोटा कोरोला मोटार चालविल्याने मुंबईत वांद्रे येथील कार्टर रोडच्या पदपथावर झोपलेले सात बांधकाम मजूर चिरडून ठार, आठ जखमी. दंडाधिकारी न्यायालयात सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा. सर्वदूर टीका झाल्यानंतर शिक्षा वाढविण्यासाठी उच्च न्यायालयाचा स्वत:हून हस्तक्षेप.
वर्ष २००७- निष्काळजीपणाने मोटार चालविल्याबद्दल उच्च न्यायालयाकडून तीन वर्षांच्या कारावासाची व जबर भरपाईची शिक्षा. सर्वोच्च न्यायालयातही ही शिक्षा कायम. राज्य सरकारने मागणी न केल्याने शिक्षा याहून वाढविण्यास नकार.
 
- नूरी हवेलीवाला ( मुंबई) :
नूरी हवेलीवाला या अनिवासी भारतीय सौंदर्यज्ञ महिलेने ३० जानेवारी २०१० साली दारूच्या नशेत भरधाव वेगाने गाडी चालवत सहा जणांना चिरडले होते. त्यातील तीन जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मुंबईतील विशेष न्यायालयाने तिला दोषी ठरवत ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा आणि ५ लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. 
 
- जान्हवी गडकर  (मुंबई):
कॉर्पोरेट वकील असलेल्या जान्हवी गडकरने ९ जून २०१५ च्या मध्यरात्री दारूच्या नशेत ईस्टर्न फ्री वे समोरून येणाऱ्या एका टॅक्सीला धडक दिली होती. या अपघातात टॅक्सीचालकासह दोन जण जागीच ठार झाले, तर चार प्रवासी गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणाची सुनावणी अद्याप सुरू असून तिचे लायसन्स कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहे.