शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

हिट अॅण्ड रन केस प्रकरणी कॉसमॉस बँकेचे चेअरमन मुकुंद अभ्यकरांना अटक

By admin | Updated: July 18, 2016 12:55 IST

हिट अँण्ड रन केस प्रकरणी कॉसमॉस बँकेचे चेअरमन डॉ मुकुंद अभ्यकर यांना अटक करण्यात आली आहे, मुकुंद अभ्यकर यांच्या गाडीने दिलेल्या धडकेत महिलेचा मृत्यू झाला होता

ऑनलाइन लोकमत - 
पुणे, दि. १७ : हिट अँण्ड रन केस प्रकरणी कॉसमॉस बँकेचे चेअरमन डॉ मुकुंद अभ्यकर यांना अटक करण्यात आली आहे.  मुकुंद अभ्यकर यांच्या गाडीने दिलेल्या धडकेत महिलेचा मृत्यू झाला होता. रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास भांडारकर रस्त्यावर हा अपघात झाला. अपघातानंतर मुकुंद अभ्यकर यांनी घटनास्थळावरुन पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. रात्री वैद्यकीय तपासणी केल्यानंतर मुकुंद अभ्यकर यांना अटक करण्यात आली. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 
 
अरुंधती गिरीष हसबनीस (वय 27, रा. विलोचन रेसिडेन्सी, न-हे) असे मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुंधती या पंजाब नॅशनल बँकेमध्ये नोकरी करतात. तर त्यांचे पती एका संगणक कंपनीमध्ये नोकरी करतात. त्यांना अडीच वर्षांचा ओजस नावाचा मुलगा आहे. रविवारी दुपारी अरुंधती त्यांच्या दुचाकीवरुन भांडारकर रस्त्यावरुन मैत्रीणीकडे जात होत्या. लॉ कॉलेज रस्त्याकडून त्या गुडलक हॉटेलच्या दिशेने जात होत्या.
 
(भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू)
(मुंबईत पुन्हा 'हिट अँड रन' - भरधाव कारने ५ जणांना चिरडले)
(हिट अँड रन : भरधाव कारने रिक्षाला नेले १०० मीटरपर्यंत फरपटत)
  •  
 
त्याच वेळी पाठीमागून अभ्यंकर त्यांच्या मोटारीमधून पत्नीसह गुडलक चौकाच्या दिशेने जात होते. ते स्वत: चालवीत असलेल्या भरधाव मोटारीची अरुंधती यांच्या दुचाकीला धडक बसली. भांडारकर रस्त्यावरील बँक ऑफ बडोदासमोर झालेली ही धडक एवढी जोरात होती की अरुंधती रस्त्यावर जोरात आदळल्यामुळे हेल्मेटही तुटले. हेल्मेट असूनही त्यांच्या डोक्याला जबर मार बसला. अपघातानंतर आयसीआयसीआय बँकेच्या बोळामधून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतानाच पाठीमागून येत असलेल्या पोलिसांसह नागरिकांनी अभ्यंकर यांना पकडले. 
 
मी गुडलक चौकाकडून लॉ कॉलेजच्या दिशेने मोटारीमधून जात होतो. बँक ऑॅफ बडोदापासून थोडे पुढे गेल्यावर पाठीमागून आलेल्या एका नागरिकाने मला एक महिला दुचाकी घसरुन पडली असून पाठीमागे अपघात झाल्याचे सांगितले. मी मोटार वळवून पाठीमागे जाऊन पहात असताना नागरिकांनी मलाच पकडले. पोलीस आल्यावर ते मला पोलीस चौकीमध्ये घेऊन आले. मी अपघात केलेला नाही असा दावा मुकुंद अभ्यंकर यांनी केला आहे.