शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री छगन भुजबळांना खाते मिळाले; आदेशाचा फोन खणखणताच लागलीच मुंबईकडे निघाले...
2
पीडित तरुणीचे आरोपीवर प्रेम, लग्नही केले; सर्वोच्च न्यायालयाला बदलावा लागला आपलाच निर्णय...
3
बीडमधील पवनचक्की प्रकल्प पुन्हा चर्चेत; सुरक्षारक्षकांचा चोरट्यांवर गोळीबार, एक ठार
4
मोठी घटना! भारतीय खासदारांचे विमान लँड होणार, तेवढ्यात युक्रेनने विमानतळावर केला हल्ला
5
"तिला घटस्फोट दे, नाहीतर तुला जिवे मारू’’, पत्नीच्या प्रियकराने दिलेल्या धमकीमुळे पती घाबरला, त्यानंतर...  
6
बिटकॉइन म्हणजे काय? ते कोण बनवतं? बँकेशिवाय कसं काम करतं? वाचा!
7
Vaishnavi Hagawane Death Case : राजेंद्र हगवणे अटकेआधी कुठे-कुठे फिरला?, समोर आली मोठी माहिती
8
मोठा खुलासा! ज्योती मल्होत्राने देशातील 'या' प्रसिद्ध मंदिरात घेतलेलं दर्शन, फोटोही कढले अन्...
9
IPL 2025 गाजवून बिहारच्या घरी परतला वैभव सूर्यवंशी; साऱ्यांनी केलं धमाकेदार स्वागत (Video)
10
2014 पूर्वी पाकिस्तानला योग्य उत्तर दिले नाही, BSF च्या कार्यक्रमातून अमित शाहांचा हल्लाबोल
11
'पाकिस्तान जिंदाबाद,' चिकलठाण्यात शिकाऊ कामगाराचे कंपनीतील मशीनवर देशद्रोही लिखाण!
12
‘हुंडामुक्त महाराष्ट्र - हिंसामुक्त कुटुंब’, सुप्रिया सुळे यांनी केला राज्यव्यापी लढ्याचा निर्धार, २२ जून पासून होणार सुरुवात
13
'शालू'च्या नव्या डान्सने घातला इंटरनेटवर धुमाकूळ, राजेश्वरीच्या मॉडर्न लूकवर खिळल्या सर्वांच्या नजरा
14
Shani Pradosh 2025: शनि प्रदोष आणि शनि जयंतीच्या मुहूर्तावर सलग १३ दिवस करा 'हा' प्रभावी उपाय!
15
हद्द झाली! भलत्याच देशाची छायाचित्रे, व्हिडीओ दाखवून ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रपतींना भिडले; तरी रामाफोसा म्हणत होते...
16
Shani Pradosh 2025: वैवाहिक जीवन सुखी व्हावे म्हणून 'असे' करा शनि प्रदोष व्रत; बघा व्रताचरण!
17
"आई मी चिप्सची पाकीटं चोरली नाही"; दुकानदाराचं बोलणं जिव्हारी लागलं, चिठ्ठी लिहून मुलानं आयुष्य संपवलं!
18
"मला सलमाननेच बोलावलं होतं!"; गॅलेक्सीमध्ये घुसखोरी करणाऱ्या ३२ वर्षीय मॉडेलचा मोठा दावा, म्हणाली-
19
"शिवराज्याभिषेक सोहळा ६ जून रोजी साजरा करण्याची पद्धत बंद करा आणि...", संभाजी भिडे यांचं विधान
20
Vaishnavi Hagawane Death Case : "मोक्का लावण्यासाठी काही..."; वैष्णवी हगवणे प्रकरणी सीएम फडणवीसांनी स्पष्टच सांगितले

२ वर्षांत पाठ्यपुस्तकांमधील इतिहास बदलणार- स्वामी

By admin | Updated: May 22, 2016 21:52 IST

इतिहास बदलवण्याचा आमच्या सरकारचा प्रयत्न राहणार असून येत्या २ वर्षांत इतिहासाची पाठ्यपुस्तके बदलू

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 22-  आपल्या देशात पत्रकार चुकीची माहिती देत असल्याची अनेकदा टीका होते. परंतु यात त्यांची चूक नाही. मुळात पाठ्यपुस्तकांमध्येच चुकीचा आणि भ्रम निर्माण करणारा इतिहास शिकविण्यात येत आहे. हा इतिहास बदलविण्याचा आमच्या सरकारचा प्रयत्न राहणार असून येत्या २ वर्षांत इतिहासाची पाठ्यपुस्तके बदलण्यात येतील, असे प्रतिपादन खासदार डॉ.सुब्रमण्यम् स्वामी यांनी केले. महर्षी नारद जयंतीनिमित्त विश्व संवाद केंद्राच्या विदर्भ प्रांतातर्फे पत्रकार पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.सिव्हील लाईन्स येथील चिटणवीस केंद्र येथे झालेल्या या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सहप्रचार प्रमुख जे. नंदकुमार, माजी खासदार बनवारीलाल पुरोहित व विश्व संवाद केंद्राचे प्रमुख सुधीर पाठक उपस्थित होते. आपल्या देशात अगदी आर्य काळापासूनचा चुकीचा इतिहास विद्यार्थ्यांना शिकविण्यात येत आहे. देशात अनेक शूरवीर होऊन गेले. हिंदूंनी गेल्या हजारो वर्षांपासून स्वत:चे अस्तित्व टिकविण्यासाठी संघर्ष केला असताना मुघलांच्या इतिहासाचे धडेच्या धडे आहेत. हे अयोग्य असून यात बदल होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. आपल्या देशात पत्रकारांनी सकारात्मक पत्रकारिता करण्याची आवश्यकता आहे. मुळात नोकरीसाठी पत्रकारितेची पदवी ही अट ठेवायलाच हवी आणि कायद्याबाबत त्यांना प्रशिक्षण द्यायला हवे, असे डॉ. स्वामी म्हणाले. देवर्षी नारद हे पहिले पत्रकार होते. परंतु चित्रपट आणि मालिकांमधून त्यांची प्रतिमा विनोदात्मक पद्धतीची करण्यात आली. काही लोकांनी जाणूनबुजून असे केले, असा आरोप जे. नंदकुमार यांनी लावला. यावेळी बबन वाळके आणि जयेश जग्गड यांना पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिवाय विश्व संवाद केंद्राचे सहप्रमुख प्रसाद बर्वे यांनी लिहिलेल्या देवर्षी नारद : जीवन आणि कार्य या पुस्तकाचेदेखील प्रकाशन करण्यात आले. राज ठाकरे आणि यूपीतील टॅक्सीवाल्यांचा डीएनए एकचइतिहासात आर्य बाहेरून आले व द्रविडांवर अन्याय केले, असे शिकविले जाते. परंतु आपल्या देशात सुरुवातीपासून एकतेचे वातावरण चालत आले आहेत. देशातील सर्वांचा ह्यडीएनएह्ण हा एकच आहे. अगदी राज ठाकरे आणि यूपीमधून मुंबईत आलेले टॅक्सीवाले यांची तपासणी केली तरी त्यांचा डीएनएदेखील सारखाच असेल, असे प्रतिपादन डॉ.स्वामी यांनी केले.निवडणुका पाहून मी राम मंदिराबाबत बोलत नाहीयावेळी डॉ. सुब्रमण्यम् स्वामी यांनी राम मंदिरावरून त्यांच्यावर होणाऱ्या टीकेवर भाष्य केले. राम मंदिराबाबत मी निवडणुका पाहून बोलत नाही. देशात धर्मनिरपेक्ष होण्याची फॅशन आली आहे. अयोध्येत राम मंदिर होते हे पुरातत्व विभागाच्या पाहणीत सिद्ध झाले आहे. त्यामुळे येथे मंदिर व्हायलाच हवे, असे डॉ.स्वामी म्हणाले.