शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

‘इफ्फी’त उलडगतोय जुन्या कॅमेऱ्यांचा इतिहास

By admin | Updated: November 26, 2014 00:44 IST

दोनशे कॅमेरे : गोव्यातून आणखीन सात जुने कॅमेरे संग्रहात जमा; कोल्हापूरच्या टीमचे खास कौतुक

संदीप आडनाईक - पणजी -गोव्यात सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कोल्हापूरच्या सर्वेश देवरुखकर यांच्या संग्रहातील दोनशेहून अधिक जुन्या कॅमेऱ्यांचे प्रदर्शन गोवा मनोरंजन सोसायटीच्या सभागृहात भरविण्यात आलेले आहे. या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळत असून गोव्यातून आणखी सात जुने कॅमेरे त्यांच्या संग्रहात जमा झाले आहेत. मंगळवारी अभिनेता नाना पाटेकर, सोनाली कुलकर्णी, दिग्दर्शिका समृध्दी पोरे, निखिल साने यांनी भेट देऊन कोल्हापूरच्या टीमचे खास कौतुक केले.गोवा मनोरंजन सोसायटी आणि गोवा छायापत्रकार संघटनेमार्फत इफ्फीत हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनात १८९३ पासून ते २00२ पर्यंतचे सर्व पध्दतीचे कॅमेरे ठेवण्यात आले आहेत. यामध्ये टीएलआर, एसएलआर, रेंज फाईडर, व्ह्यू कॅमेरा, लार्ज फॉर्मट, मिडिया फॉर्मट, ३५ एम. एम. ८ एम. एम. १६ एम. एम. स्पाय, ११0 एम. एम कॅमेऱ्यांचा समावेश आहे. आयकॉन, कोडॅक, पेन्टॅक, ममीया यासारखे कॅमेरे या प्रदर्शनात पहायला मिळतील. या प्रदर्शनात १८९३ चा सर्वात जुना कॅमेरा हंटर पेनरोज हे सर्वांचे आकर्षण आहे. शिवाय १९८0मधील अरबी हा सर्वाधिक महागडा कॅमेराही यात आहे. सर्वेशच्या आजोबांनी हा कॅमेरा ७0 हजार रुपयात विकत घेतला होता.या प्रदर्शनाचे उद्घाटन गोवा मनोरंजन सोसायटीचे उपाध्यक्ष दामोदर नाईक, अभिनेता उपेंद्र लिमये, यलोचे दिग्दर्शक महेश लिमये, राजेंद्र तालक, प्रियंका तालक, चंद्रकांत जोशी, एस. निंबाळकर यांनी भेट दिली. याशिवाय देशविदेशातील अनेक छायाचित्रकार प्रेमींनी या प्रदर्शनाला भेट दिली. विशेषत: उत्तरार्खडातील डेहराडून येथील निर्माते, दिग्दर्शक, लेखक डॉ. आर. के. शर्मा यांनी त्यांच्या संग्रहातील बाबुराव पेंटर व दादासाहेब फाळके यांच्या लाकडी कॅमेऱ्याची आठवण या प्रदर्शनामुळे ताजी झाल्याचे सांगितले. प्रदर्शनाला गोमंतकीयांनी उदंड प्रतिसाद दिल्याचे सर्वेश आणि त्याचे वडील संजीव देवरुखकर यांनी सांगितले. देवरुखकर यांच्यासोबत कोल्हापूरहून त्यांच्या मातोश्री अरुणा, बहिण स्नेहल, विजय टिपुगडे, नितीन भोसले, सागर कडव, जयंत भोसले ही टीम आली आहे. प्रदर्शन २७ नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. पिढीजात संग्राहकसर्वेश देवरुखकर यांच्या संग्रहात आजअखेर ७00 च्या आसपास कॅमेरे आहेत. यात बाबुराव पेंटर यांनी तयार केलेल्या कॅमेऱ्याशी साधर्म्य सांगणाऱ्या कॅमेऱ्यासह वृत्तपत्र छायाचित्रकारांसाठी आवश्यक असणारे तसेच आकाराने सर्वात मोठा आणि सर्वात छोटा पोलोराईड कॅमेराही या संग्रहात आहेत. सर्वेश कोल्हापूरच्या दळवीज आर्टसमध्ये फाईन आर्टसचे शिक्षण घेत आहे. त्याचे वडील संजीव देवरुखकर यांनी यातील बहुतेक कॅमेरे संग्रहित केले आहेत. त्याचे आजोबाही कॅमेऱ्याचे सर्वात जुने संग्राहक होते.