शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

फक्त इयत्ता बदलली; शिवरायांचा इतिहास आता सहावीच्या अभ्यासक्रमात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 17:40 IST

शिवरायांचा इतिहास हद्दपार केला नाही; महाराष्ट्र शिक्षण मंडळाचं स्पष्टीकरण

मुंबई: केंद्रीय शिक्षण मंडळातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास डावलण्यात आल्याची माहिती समोर आल्यामुळे विरोधकांनी सरकार धरलं. ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत हा विषय चर्चेत आल्यानं त्यावरुन राजकारण पेटलं आहे. या प्रकरणी आता महाराष्ट्र शिक्षण मंडळानं स्पष्टीकरण दिलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे वेगळे पैलू इयत्ता सहावीच्या अभ्यासक्रमात उलगडणार असल्याचं मंडळानं म्हटलं आहे. याआधी शिवरायांचा इतिहास चौथीत शिकवला जात होता. यापुढे हा इतिहास सहावीत शिकवला जाईल, असं महाराष्ट्र शिक्षण मंडळानं स्पष्टीकरणात म्हटलं आहे. एकीकडे केंद्रीय शिक्षण मंडळातून छत्रपतींचा इतिहास डावलला जात असल्याची टीका होत असतानाच राज्याच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने चौथीच्या पुस्तकातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हद्दपार करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानं सरकारवर चौफेर टीका झाली आहे. चौथीच्या पुस्तकातून शिवरायांचा इतिहास हद्दपार; राज्याच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचा प्रकारमहाराष्ट्राची संस्कृती जपत आंतरराष्ट्रीय शिक्षण राज्यातील विद्यार्थ्यांना मिळावं या दृष्टीनं महाराष्ट्र राज्य आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची सुरुवात झाली. या मंडळाने यंदा पहिली ते चौथीच्या पुस्तकाची छपाई केली आहे. त्यातून ही बाब समोर आली. सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असताना शिवाजी महाराजांचा इतिहास कधीही न बदलण्याचा ठराव विधिमंडळात झाला होता. त्यानंतर अनेक सरकार बदलली, मात्र पुस्तकातील अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कायम ठेवण्यात आला होता. अभ्यासक्रमात शिवाजी महाराजांचा इतिहास परत घ्या अन्यथा... धनंजय मुंडेंचा इशाराचौथीच्या अभ्यासक्रमातून शिवरायांचा इतिहास वगळल्याची माहिती समोर येताच विरोधकांनी सरकारला लक्ष्य केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हद्दपार करणाऱ्या भाजपा-शिवसेनेचं सरकार हद्दपार करण्याची हीच ती वेळ आहे. त्यामुळे राज्यातील शिवप्रेमींनी आता घालवुया सरकार हे एकच उद्दिष्ट ठेऊन काम कराव असं आवाहन काँग्रेसचे माजी खासदार अशोक चव्हाण यांनी केलं. खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनीदेखील या प्रकरणावर संताप व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चौथीच्या पुस्तकातून पुसण्याचा घाट घातला गेला असेल तर हे खपवून घेतलं जाणार नाही. ज्यांनी कुणी ही आगळीक केली असेल, त्यांच्यावर तात्काळ कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली. 

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज