मसूर : येथील मसूर स्पोर्टस क्लबच्या खो-खोच्या खेळाडूंनी दिल्ली येथील राजीव गांधी स्टेडियम येथे झालेल्या चौथ्या राष्ट्रीय ग्रामीण खो-खो स्पर्धेच्या विविध वयोगटांत तब्बल २५ खेळाडूंनी सुवर्णपदक मिळवून मसूरचा झेंडा दिल्लीत फडकावून मसूरचे नाव महाराष्ट्राच्या नकाशात सुवर्णअक्षरांनी कोरले. या स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलींच्या संघात जान्हवी बर्गे, ज्ञानेश्वरी निकम, अमृता इंगवले, अंकिता मोहिते, पूजा तुपे, प्रतीक्षा कुंभार, तर १७ वर्षांखालील मुलांच्या संघात रोहित रेणुशे, ओंकार खुडे, शुभम जाधव, शुभम विजय जाधव, पंकज कुंभार, प्रथमेश जाधव, प्रवीण कांबिरे, सूरज कांबिरे, हणमंत जगताप, तर १९ वर्षांखालील मुलांच्या संघात सोमनाथ चिकणे, ज्ञानेश्वर बर्गे, अक्षय धस, सचिन यादव तसेच खुल्या पुरुष गटात मयूर साबळे, सुयश भंडारे, अतुलकुमार मोरे, अविनाश जरग तसेच खुल्या मुलींच्या संघात श्रुती नळगुणे, पूनम जाधव या पंचवीस विद्यार्थ्यांनी ही सुवर्णपदके खेचून आणून हे घवघवीत यश संपादन केले. या खेळाडूंना प्रशिक्षक राजवर्धन कांबिरे, मयूर साबळे, ग्रामपंचायत मसूर, आमदार बाळासाहेब पाटील, मसूर स्पोर्टस क्लबचे संभाजी बर्गे, समीर शहा, अविनाश जगदाळे, जगन मोरे, कासम पटेल, पद्माकर देशमाने, भाऊ साहेब बर्गे, नरेश माने, विठ्ठल जाधव, संजय जाधव, शरद जाधव, प्रा. कादर पीरजादे, अभिजित शेंबडे, दत्तात्रय जगदाळे, प्रकाश जाधव, शरद जाधव, जगन्नाथ कुंभार, वरिष्ठ खेळाडू यांनी प्रयत्न केले. या सर्व यशस्वी खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे. (वार्ताहर) मसूरच्या शिरपेचात मानाचा तुरा अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत केवळ या खेळावरची निष्ठा म्हणून येथील खेळाडू आणि प्रशिक्षक यांच्या जिद्दीमुळेच हे यश मिळविता आले. २५ खेळाडूंनी महाराष्ट्राच्या खो-खो संघात विविध वयोगटांतून आपले कौशल्य पणाला लावत सुवर्णपदके खेचून आणली. यामुळे मसूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
२५ सुवर्णपदके मिळवून रचला इतिहास
By admin | Updated: January 29, 2015 23:42 IST