शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

हिंदस्थान हे हिंदुराष्ट्रच - उद्धव ठाकरेंचा सरसंघचालकांना पाठिंबा

By admin | Updated: August 21, 2014 09:28 IST

सरसंघचालक मोहन भागवत यांच्या 'हिंदुस्थान हे हिंदू राष्ट्रच' या विधानाचा पुनरुच्चार करत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी या विधानाला सहमती दर्शवली आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ -  सरसंघचालक मोहन भागवत यांच्या 'हिंदुस्थान हे हिंदू राष्ट्रच' या विधानाचा पुनरुच्चार करत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी या विधानाला सहमती दर्शवली आहे. 'देश हिंदुत्वाने भारला आहे, हिंदूंच्या विचारांचा वणवा भडकला आहे, यापुढे हिंदू समाज अपमान सहन करणार नाही. कुणाची हरकत असो वा नसो हे हिंदू राष्ट्रच आहे'  असे मत सामनातील अग्रलेखाद्वारे मांडण्यात आले आहे. सं
सरसंघचालकांवर होणा-या टीकेत आश्चर्य वाटण्यासारखे नाही, ज्या देशाचा डोलारा बेगडी निधर्मीवादाच्या ठिसूळ पायावर उभा आहे व जेथे मुस्लिम लांगूलचालन हेच राजकीय पोटापाण्याचे उद्योग आहेत तेथे दुसरे काय होणार असेही लेखात म्हटले आहे. देशात काँग्रेसचे सरकार असताना व मुसलमानी मतांसाठी हिंदू समाजाची गळचेपी सुरू असतानाही आधी स्वातंत्र्यवीर सावरकर व नंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी अनेकदा 'हे हिंदू राष्ट्रच आहे' असे ठणकावून सांगितले होते. त्यांनी हिंदुत्वाचा अंगार चेतवल्यानेच कॉंग्रेस व त्यांच्या बगलबच्यांच्या निधर्मी ढोंगाची राखरांगोळी झाली. 
 
अग्रलेखातील महत्वाचे मुद्दे -
मोदी हे पंतप्रधान झाले ते त्यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांमुळेच व या देशातील समस्त हिंदू समाजाने जात, पंथ विसरून फक्त हिंदू म्हणूनच शिवसेना-भाजपास मतदान केले. कॉंग्रेसच्या मुसलमानी चाटुगिरीस वैतागलेल्या हिंदू समाजाने बेगडी निधर्मीवादाला मूठमाती दिली व संपूर्ण उत्तर प्रांतात दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशसह बिहारात एकही मुसलमान खासदार निवडून येऊ शकला नाही. 
हा हिंदू एकजुटीच्या वज्रमुठीचा विजय आहे व ही वज्रमूठ अशीच राहिली तर हा देश ‘हिंदुराष्ट्र’ म्हणून मान्यता पावण्यास फारसा उशीर लागणार नाही.  लोकसभा निवडमुकूतही हेच चित्र दिसले. हिंदूंच्या संयमाचा बांध फुटला व त्याचा परिणाम निवडणुकीत दिसला. कॉंग्रेस, समाजवादी पार्टी वगैरे पक्षांच्या सरकारने १५ टक्के मुस्लिमांच्या धर्मांधतेपुढे सतत गुडघे टेकले आणि त्याचवेळी ८५ कोटी हिंदूंना अपमानित केले आणि त्यांची सहनशक्ती संपली. 
ज्या वंदे मातरम्ने स्वातंत्र्यलढ्याला प्रेरणा दिली ते वंदे मातरम् गायचे नाही,  कारण पंधरा टक्के मुस्लिम समाजातील धर्मांध नेते विरोध करतात. वंदे मातरम्मुळे मुस्लिमांच्या भावना दुखावतात. त्यांचा इस्लाम खतर्‍यात येतो. 
या देशातील मुसलमान कुटुंब नियोजन पाळत नाही. कारण ‘छोटे कुटुंब सुखी कुटुंब’ ही संकल्पना इस्लामला मान्य नाही. हिंदूंनी लोकसंख्या कमी करायची व मुसलमानांनी वाढवायची. त्यामुळे देशाचा समतोल बिघडला व कॉंग्रेससह सर्व बेगडी निधर्मीवाद्यांनी मुस्लिम मतांसाठी हिंदूंचे अस्तित्वच धोक्यात आणले.
त्यामुळे हिंदू चिडला. तो आधी शिवसेनाप्रमुखांच्या पाठीशी उभा राहिला व आता शिवसेनाप्रमुखांचे आशीर्वाद लाभलेल्या मोदी यांच्या पाठीशी उभा राहिला! 
उत्तर प्रदेशात मुलायम यांचे पुत्र राज्य करत असून तेथे हिंदू मुलींना दिवसाढवळ्या उचलून बलात्कार केले जातात. त्यांचे जबरदस्तीने धर्मांतर केले जाते व त्याविरोधात आवाज उठविणार्‍यांना गुन्हेगार ठरविले जाते. या सर्व प्रकारामुळे त्यामुळे हिंदू चिडला व त्यांनी लोकसभा निवडणुकीत मुलायम यांचे पानिपत केले. उत्तर प्रदेशातील यादवी संपली व तेथे हिंदुत्ववादी विचारांचे ७१ खासदार निवडून आले. हिंदुत्वाचा हा विजय म्हणजेच हिंदुस्थान हे हिंदुराष्ट्र होत असल्याची पोचपावतीच आहे.
मोदी सत्तेवर येताच हिंदूची अस्मिता ठिणग्यांप्रमाणे चमकू लागली आहे. त्यामुळे मोहन भागवत यांनी आज खुलेआम सांगितले की, हे हिंदुराष्ट्रच आहे! जनतेने मुस्लिम धर्मांधांना पाठीशी घालणारे सरकार खाली खेचले आहे. 
कॉंग्रेसचे सरकार दिल्लीत आणखी काही काळ राहिले असते तर आणखी एका पाकिस्तानच्या मागणीस जोर चढला असता व हे राष्ट्र इस्लामी धर्मांधांचे गुलाम झाले असते, पण लोकशाही मार्गाने हे राष्ट्र हिंदुराष्ट्र झाले. देश हिंदुत्वाने भारला आहे. यापुढे हिंदू समाज अपमान सहन करणार नाही. जो अपमान सहन करेल तो हिंदू रक्ताचा नाही. हिंदूंच्या विचारांचा वणवा भडकला आहे. होय, हे हिंदुराष्ट्रच आहे! कुणाची हरकत असो अगर नसो!