श्यामकुमार पुरे / ऑनलाइन लोकमत
सिल्लोड, दि. 14 - अजिंठा येथे मंगळवारी सकाळी मुस्लीम व हिंदू बांधवानी गळा भेट घेऊन बकरी ईद साजरी केली तर संध्याकाळी पोलीस ठाण्यातील सार्वजनिक गणपतीची सयुक्त आरती केली. एकोप्याने सण साजरे केल्याने हा एक चर्चेचा विषय झाला आहे.
मुस्लीम बांधवाना सकाळी बकरी ईद निमित्त शुभेच्छारुपी हिंदू बांधवाच्या हस्ते गुलाबाचे फुल देऊन गळाभेट घेण्यात आली.तर संध्याकाळी गणपतीच्या आरतीचा मान मुस्लीम बांधवाना देत अजिंठा पोलीस ठाण्याचे सपोनि मनोहर वानखेडे यांनी जगप्रसिद्ध अजिंठयात "राष्ट्रीय ऐकोप्याचा" आभिनव उपक्रम राबवून मंगळवारी (दि.१३) सुखद पायडां रचला.
मगंळवारी बकरीईद निमित्त सपोनि मनोहर वानखेडे यांनी गावातील हिंदू बांधवाना सोबत घेऊन ईदगाह मैदाना समोर जाऊन अजिंठयासह शिवना आदी पारिसरातील मुस्लीम बांधवाना गुलाबाचे फुल देत गळाभेट घेऊन शुभेच्छा दिल्या.तसेच सांयकाळी जय हिंद गणेश मंडळाच्या वतिने अजिंठा पोलीस ठाण्यात बसविण्यात आलेल्या गणपतीची आरतीला हिंदु-मुस्लीम बांधवाना ऐकत्रीतपणे बोलवले. तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष शेख मन्नान यांना आरतीचा मान दिला.शेख मन्नान यांच्या हस्ते सायंकाळची आरती करुन बकरी ईद व गणेशोस्तवाचे औचित्य साधून उपस्थीतांन समोर "राष्ट्रीय ऐकात्तमेचे" सुखद दर्शन या निमित घडविले.यावेळी आरती ला तंटामुक्त समिती अध्यक्ष शेख मन्नान,ग्रा.प.सदस्य मंहमदखॉ पठाण,राजेश ढाकरे,समीर खाॅन,नसीर खाँ,जमील मोमीन,सय्यद ऐजाज,शेख नदीम,फकिर मंहमद,भालचंद्र जोशी (महाराज),सपोनि मनोहर वानखेडे,फौजदार अर्जुन चौधर,पोहेकॉ सुभाष नवसरे,रमेश जगदाळे,भिमराव सोनवणे,अजित शेकडे,अनंत जोशी,कृष्णा ढाकरे,मनोहर सपकाळ,प्रविण बोधवडे आदीसह गावातील प्रतिष्ठीत,पोलीस कर्मचारी,होमगार्ड आदी उपस्थीत होते.
सगळ्यात आंनदाचा दिवस..
सकाळी बकरी ईद,सांयकाळी गणपती आरती दोन्ही प्रंसगी हिदुं-मुस्लीम समाज बांधवांनी माझ्या कल्पनेला ऐवढा मोठा दिलेला प्रतिसाद पाहता मी भारावून गेलो,माझ्या जिवनातला मोठा आनंदाचा दिवस ठरला.
..-सपोनि मनोहर वानखेडे
सर्व सन एकोप्याने साजरे करणार
आमच्या गावातील सर्व समाजातील लोक सर्वसमाजाच्या सणा निमित्त ऐकमेकाना नेहमीच शुभेच्छा देतात,तसेच मोहरम,मोगलशहावली नानाचे ऊर्स आदीत दोन्ही समाजाचा एकत्रीतपणे सहभाग असतो पण आजच्या उपक्रमाने व अचानक आरतीचा मान मिळाल्याने मी भाराऊन गेलो.आम्ही सर्व सन एकोप्याने साजरे करणार आहोत.
-शेख मन्नान तंटा मुक्त गाव समिती अध्यक्ष अजिंठा
जुन्या आठवणीना उजाळा..
माझ्या वार्डातील हनुमान नगर मधील भारत गणेश मंडळाचा अध्यक्ष म्हणून सलग पाच वर्ष काम केले.अजिंठा पोलीसाच्या आजच्या अभिनव उपक्रमा निमित्त जुन्या दिवसाना उजाळा मिळाला.
मंहमदखाँ पठाण (ग्रा.प.सदस्य)