शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
2
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
3
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
4
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
5
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
6
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
7
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
8
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
9
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
10
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
11
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
12
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
13
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
14
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
15
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
16
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
17
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
18
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
19
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
20
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास

हिमेश रेशमियाचा फसलेला प्रयत्न

By admin | Updated: May 18, 2014 00:03 IST

अनंत महादेवन यांच्या दिग्दर्शनात बनलेला ‘एक्सपोज’ हा चित्रपट सस्पेन्स थ्रिलर प्रकारातला आहे. अशा चित्रपटाला योग्य न्याय न दिल्याने चित्रपटाने पूर्णपणो निराश केले आहे.

हिंदी चित्रपट
अनुज अलंकार
अनंत महादेवन यांच्या दिग्दर्शनात बनलेला ‘एक्सपोज’ हा चित्रपट सस्पेन्स थ्रिलर प्रकारातला आहे. अशा चित्रपटाला योग्य न्याय न दिल्याने चित्रपटाने पूर्णपणो निराश केले आहे. एखादा श्रीमंत मुलगा पैसे उधळण्यासाठी मागचा-पुढचा विचार न करता आपली हौस भागवतो. अगदी त्याप्रमाणो हिमेशने हा चित्रपट बनवून पैसे आणि वेळ फुकट घालवला आहे.
6क्च्या दशकातील हिंदी चित्रपटसृष्टी कशी होती, यावर साधारण हा चित्रपट आधारित आहे. मात्र त्याला एका हत्येची पाश्र्वभूमी असून, त्यातील रहस्य उलगडण्याचे काम चित्रपट करतो. रवी कुमार (हिमेश रेशमिया) हा पोलीस अधिकारी असतो. पण एका मंत्र्याच्या हत्येच्या आरोप त्याच्यावर आल्याने त्याला नोकरीवरून काढून टाकले जाते. हा रवी आता दक्षिणोतल्या चित्रपटसृष्टीचा लोकप्रिय कलाकार आहे. तेथील दिग्दर्शक (अनंत महादेवन) त्याला घेऊन चित्रपट काढण्याचे ठरवतात. त्यात अति महत्त्वाकांक्षी जारा (सोनाली राऊत) त्याची हीरोईन असते. त्याच वेळी अजून एका चित्रपटाचे काम सुरू होते. त्यात एका नव्या हीरोईनला चांदनी (झोया अफरोज)ला संधी देण्यात येते. जारा आणि चांदनीत जुनी खुन्नस असते. यातून जारा रवी कुमारला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करते. पण रवी चांदनीवर प्रेम करायला लागतो. दरम्यान, एका पार्टीचे आयोजन केले जाते. त्यात जाराची हत्या होते. त्यात अनेक जण संशयाच्या भोव:यात सापडतात. शेवटी रवी कुमार तिच्या मृत्यूचे सत्य उघड करतो.
उणिवा- या चित्रपटाचे दिग्दर्शन अनंत महादेवन यांनी केले आहे. पण त्यांचा सहभाग नावालाच दिसतो. हिमेशने चित्रपटाची सगळी सूत्रे आपल्याच हाती ठेवली आहेत. तसेच प्रत्येक दृश्यात तो सतत सपाट चेह:याने वावरत असल्याने चित्रपट ङोलणो कठीण होते. रवी कुमारच्या भूमिकेत त्याने राजकुमार यांची कॉपी करून स्वत:चे हसे करून घेतले आहे. चित्रपटातील संवाद हे रवीच्या भूमिकेशी अजिबात मेळ खात नाहीत. तसेच  प्रसिद्ध गायक हनी सिंगला संधी दिली आहे. त्यानेही हिमेशसारखीच भूमिका केली आहे. अनंत महादेवन तर दिग्दर्शक असूनही चित्रपटातील आपली भूमिका समजूनच घेऊ शकलेले नाहीत. जाराची भूमिका करणारी सोनाली राऊत चांगली अभिनेत्री असूनही तिच्या भूमिकेला योग्य न्याय दिलेला नाही. चांदनीच्या भूमिकेतील झोया अफरोजने ग्लॅमरची गरज पूर्ण करण्याव्यतिरिक्त काहीही केलेले नाही. 6क्च्या दशकातील बॉलिवूडचा माहोल, परिस्थिती दाखवण्यात अनंत महादेवन आणि टीम पूर्णपणो अपयशी ठरली आहे.
वैशिष्टय़े - इरफान खानने केलेली सूत्रधाराची भूमिका चांगली जमली आहे. तो चित्रपट बांधून ठेवण्याचा प्रयत्न करतो. सोनाली राऊत प्रभाव पाडण्यात यशस्वी ठरली आहे.