शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
2
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
16
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
17
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
18
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
19
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
20
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख

महामार्गावर माझेरी घाटात कोसळली दरड

By admin | Updated: April 3, 2017 03:41 IST

महाड-वरंध-भोर-पंढरपूर मार्गावर माझेरी घाटात मध्यरात्री ३ वाजता दरडी कोसळल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला

महाड : महाड-वरंध-भोर-पंढरपूर मार्गावर माझेरी घाटात मध्यरात्री ३ वाजता दरडी कोसळल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता. मात्र, आठ तासांच्या प्रयत्नांनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यंत्रणेने या दरडी दूर केल्याने रविवारी सकाळी १० वा. नंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली. मात्र, त्या वेळी घाटात सुदैवाने वाहनांची वर्दळ नसल्याने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. या घाटातील कड्यांना मोठ्या प्रमाणावर तडे गेल्याने पावसाळ्यातही दरडी कोसळण्याचा धोका अधिक संभवत असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी दिली.महाड-भोर-पंढरपूर हा प्रमुख राजमार्ग क्र. १५ म्हणून ओळखला जात असून या मार्गावरून पुण्याकडे जाण्यासाठी रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश प्रवासी या मार्गाचा वापर करतात. अत्यंत अवघड व धोकादायक वळणे असलेल्या या माझेरी-वाघजाई घाटातून वाहने चालवणे मोठे जिकिरीचे असते. पावसाळ्यात अनेक वेळा या मार्गावर दरडी कोसळण्याचा धोका असतो. त्यामुळे पावसाळ्यात या मार्गावरून वाहन चालकांना व प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. शनिवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास माझेरी गावापासून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर तीन कि.मी. अंतरावर ही दरड कोसळली. याबाबतचे वृत्त समजताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एम. एन. म्हस्के व सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता अमृत पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही दिशेची वाहतूक थांबवली व जेसीबी यंत्राच्या साह्याने कोसळलेल्या दरडी बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले. सकाळी १० वा. मार्गावर कोसळलेल्या दरडी मातीचे ढिगारे बाजूला केल्यानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली. महाड आगारातून सुटणाऱ्या भोर मार्गे पुणे एसटी बसेस ताम्हाणी मार्गे पुण्याकडे सोडण्यात आल्या तर दरडी कोसळलेल्या ठिकाणी दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. (वार्ताहर)>उष्णतेमुळे तडे गेल्याने दरडीचा धोका कायममाझेरी व वाघजाई घाटातील डोंगर कड्याचा दगड हा बेसाल्ट प्रकारचा असून, या प्रकारच्या दगडावर सध्या पडणाऱ्या उष्णतेचा मोठा परिणाम होऊन या कड्यांना मोठ्या प्रमाणावर तडे गेल्यानेच या दरडी कोसळल्या आहेत. याबाबतचा अहवाल वरिष्ठांना सादर केला असून, या तड्यांमुळे येत्या पावसाळ्यात देखील या मार्गावर दरडी कोसळण्याचा धोका कायम आहे.- अमृत पाटील, शाखा अभियंता, सा.बां. महाड.