शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई शहरात वाढल्या अतिधोकादायक इमारती

By admin | Updated: May 20, 2016 02:57 IST

गतवर्षीच्या तुलनेत धोकादायक इमारतींचा आकडा यंदा वाढला आहे़

मुंबई : गतवर्षीच्या तुलनेत धोकादायक इमारतींचा आकडा यंदा वाढला आहे़ तब्बल ७४० इमारती कोसळण्याच्या स्थितीत असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे़ त्यामुळे या इमारतीतील हजारो रहिवासी जीव मुठीत घेऊन जगत आहेत. पावसाळ्यापूर्वी या इमारती रिकाम्या करण्यासाठी पालिकेने नोटीस बजाविण्यास सुरुवात केली आहे़पावसाळ्यापूर्वी पालिकेने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे़ गेल्या वर्षी ५४२ इमारती अतिधोकादायक असल्याचे आढळून आले होते़ यंदा मात्र हा आकडा वाढून तब्बल ७४० वर पोहोचला आहे़ सी १ श्रेणी म्हणजे अतिधोकादायक इमारतींच्या यादीमध्ये शहरात १४६, पूर्व उपनगरात २८६ आणि पश्चिम उपनगरात ३०८ इमारतींचा समावेश आहे़ या इमारती पावसाळ्यात कोसळण्याचा धोका आहे़गेल्या वर्षी पालिकेच्या मालकीच्या धोकादायक इमारतींमधील वीज व पाणीपुरवठा खंडित करण्यात आला होता़ मात्र या कारवाईला रहिवाशांकडून तीव्र विरोध झाला़ त्यामुळे धोकादायक इमारतींचा प्रश्न यंदाही ‘जैसे थे’ आहे़ पालिकेने नोटीस पाठवून इमारत खाली करण्याचा इशारा या वर्षीही रहिवाशांना दिला आहे़ मात्र रहिवासी अन्यत्र स्थलांतरित होण्यास तयार नाहीत़ (प्रतिनिधी)>आमची जबाबदारी नाही़़. रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याची नोटीस देण्यास पालिकेने सुरुवात केली आहे़ मात्र छप्पर जाण्याच्या भीतीने रहिवासी इमारत सोडण्यास तयार नाहीत़ त्यामुळे पालिकेने न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे़ त्यानुसार धोकादायक इमारतींमधून रहिवासी स्थलांतरित होण्यास तयार नसल्याने भविष्यात दुर्घटना घडल्यास त्यास पालिका जबाबदार राहणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे़