शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात हायअलर्ट...

By admin | Updated: January 26, 2016 03:02 IST

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. सर्व महत्त्वाच्या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला

मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. सर्व महत्त्वाच्या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करावा. संशयास्पद वस्तू, व्यक्तीबाबत पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईत सुमारे ३० हजार पोलीस बंदोबस्तात तैनात करण्यात आले असल्याचे आयुक्त अहमद जावेद यांनी सांगितले. इस्लामिक स्टेट (इसिस) या अतिरेकी संघटनेने देशातील प्रमुख ठिकाणी घातपात करण्याचा कट सुरक्षा यंत्रणांनी उधळून लावला आहे. संघटनेशी सहभागी असलेल्यांची धरपकड करण्यात आलेली आहे. तरीही प्रजासत्ताक दिनी कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी योग्य खबरदारी घेण्याचे आदेश राज्याचे पोलीस प्रमुख प्रवीण दीक्षित यांनी दिलेले आहेत. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी होणारा प्रजासत्ताक सोहळा उत्साहात साजरा करताना नागरिकांनी सभोवतालच्या परिस्थितीबाबत सजगता बाळगावी, कोणत्याही अफवांना बळी पडू नये, संशयास्पद वस्तू, व्यक्तीबाबत तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन केले आहे. मुंबईतील सर्व महत्त्वाच्या व गर्दीच्या ठिकाणांवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहर व उपनगरात सुमारे ३० हजार पोलीस तैनात ठेवण्यात आले असल्याचे आयुक्त अहमद जावेद यांनी सांगितले. (प्रतिनिधी) रेल्वे पोलीस सज्जप्रजासत्ताक दिनावर दहशतवादी हल्ल्याचे सावट पाहता रेल्वे पोलिसांकडूनही सतर्कता बाळगण्यात आली आहे. जवळपास ७ हजार आरपीएफ, जीआरपी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवरील स्थानकांवर तैनात करण्यात आले आहेत. उपनगरीय लोकल मार्गांवर रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) आणि जीआरपीकडून सुरक्षेची जय्यत तयारी केली आहे. रेल्वे कमांडो, श्वानपथक, बॉम्बशोधक पथक रेल्वे पोलिसांकडून तयार ठेवण्यात आले आहे. प्रत्येक स्थानकाची तपासणी करतानाच सामानाची आणि संशयित व्यक्तींची कसून तपासणी केली जात आहे. मध्य रेल्वेच्या सीएसटी, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, सीएसटी, कल्याण तर पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट, मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे टर्मिनस, अंधेरी आणि बोरीवली स्थानकात अधिक दक्षता घेण्यात आली आहे. फेरीवाल्यांना हटविले स्थानक आणि हद्दीतून फेरीवाल्यांनाही हटविण्यात आले आहे. तसेच संशयितांची कसून चौकशी केली जात आहे. खबरदारीचे सर्व उपाय योजण्यात आले आहेत. - आनंद झा, पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त बॉम्बशोधक व बॉम्बनाशक पथके स्थानकांवर तैनात करण्यात आली आहेत. - सचिन भालोदे,मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त