शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील विसर्जन तलावांची दुरवस्था,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 07:02 IST

- प्राची सोनवणे, वैभव गायकर   नवी मुंबई : शहरातील मान्सूनपूर्व कामांचा बोजवारा उडाला असून, नालेसफाई, तलावांची स्वच्छता न झाल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. गणेशाचे आगमन अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपले आहे. तरी नवी मुंबई, पनवेल परिसरातील बहुतांशी विसर्जन तलावांची दुरवस्था झाली आहे. गणेशोत्सवादरम्यान भाविकांनाही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार ...

- प्राची सोनवणे, वैभव गायकर   नवी मुंबई : शहरातील मान्सूनपूर्व कामांचा बोजवारा उडाला असून, नालेसफाई, तलावांची स्वच्छता न झाल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. गणेशाचे आगमन अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपले आहे. तरी नवी मुंबई, पनवेल परिसरातील बहुतांशी विसर्जन तलावांची दुरवस्था झाली आहे. गणेशोत्सवादरम्यान भाविकांनाही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार असल्याचे चित्र पाहायला मिळते.तलाव परिसरात सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली असूनही हे सुरक्षारक्षक जागेवर नसल्याची तक्रार परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. रात्रीच्या वेळी याठिकाणी गैरप्रकार होत असल्याने परिसरातील महिला तसेच विद्यार्थ्यांना असुरक्षित वाटत असल्याचेही नागरिकांनी सांगितले. याठिकाणी रात्रीच्या वेळी मद्य पार्टी सुरू असून, तलाव परिसरात दारूच्या बाटल्यांचा खच पाहायला मिळतो. गेल्या काही दिवसांपूर्वी तीज सणामुळे तलाव परिसरातील निर्माल्य वेळीच उचलण्यात आले नसून परिसर अस्वच्छ झाला आहे. नवी मुंबई महापालिकेने तलाव व्हिजन मोहीम राबवून तलावांच्या सुशोभीकरणासाठी कोट्यवधी रु पये खर्च करून तलावांचे सुशोभीकरण केले. परंतु शहरातील काही तलावांची देखभाल न केल्याने त्यांची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी तर तलावाच्या बाजूला वाहने धुण्याचे हक्काचे ठिकाण म्हणून तलावांचा वापर केला जात आहे. बेलापूर, घणसोली, वाशी, कोपरी, रबाळे, कोपरखैरणे परिसरातील तलावांची दुरवस्था झाली आहे.वाशीतील कोपरी गावाजवळच्या महापालिकेच्या तलावात दररोज टँकर, ट्रक, टेम्पो, डम्परसारखी वाहने धुतली जातात. त्यामुळे रसायने, ज्वालाग्राही पदार्थ आणि इंधन तलावात मिसळून पाणी दूषित होत असते. या तलावात ग्रामस्थांनी मासे सोडले होते. ते दूषित पाण्यामुळे मृत पावत आहेत. या तलावाजवळ गॅरेज आहेत ते हटवल्यास येथे वाहने धुण्याचे प्रकार कमी होतील, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. आग्रोली तलावात झालेल्या दुर्घटनेनंतरही याठिकाणी सुरक्षारक्षक जागेवर नसल्याची तक्रार स्थानिक नगरसेवक तसेच नागरिकांनी केली आहे. या तलावाचे सुशोभीकरणाचे काम अद्यापही रखडले असून या गणेशोत्सवात मात्र भाविकांना अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बोर्डाच्या वतीने नेमण्यात आलेले सुरक्षारक्षक कधीच जागेवर नसल्याने तलाव परिसराचा गैरवापर केला जातो. जवळपासच्या गावातील स्थानिक तरुणांची या ठिकाणी नेमणूक केली जावी, अशी मागणी नगरसेविका सरोज पाटील यांनी केली आहे. यामुळे स्थानिकांना रोजगाराची संधी देखील मिळेल आणि या तरुणांना या परिसराची माहिती तसेच तलावाची खोली आदीबद्दल माहिती असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. सुरक्षा यंत्रणेवर प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.नवी मुंबई परिसरात आग्रोली, बेलापूर गाव, दारावे, करावे, किल्ले गावठाण, नेरुळ सेक्टर २०,शिरवणे, जुहूगाव, कोपरी, वाशीगाव, सानपाडा, तुर्भेगाव, खैरणे, कोपरखैरणे, महापे, सावलीगाव, गोठिवली, गुलनाली, राबाडा, तळवली, ऐरोली नाका, दिवा, बोरोला, खोकड आदी २४ तलावांचा समावेश आहे.विसर्जन घाटांवर कचºयाचे साम्राज्य