शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात आघाडीवर शिक्कामोर्तब

By admin | Updated: November 4, 2015 02:40 IST

महानगरपालिकेतील सत्तासंघर्षावर पडदा टाकत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करण्याचा निर्णय मंगळवारी घेतला. सर्वाधिक २७ नगरसेवक असलेल्या काँग्रेसकडे महापौरपद

कोल्हापूर : महानगरपालिकेतील सत्तासंघर्षावर पडदा टाकत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करण्याचा निर्णय मंगळवारी घेतला. सर्वाधिक २७ नगरसेवक असलेल्या काँग्रेसकडे महापौरपद राहणार असून, उपमहापौरपद हे राष्ट्रवादीकडे असेल.महापालिका निवडणुकीचे निकाल सोमवारी जाहीर होताच, काँग्रेस हाच सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला, पाठोपाठ राष्ट्रवादीने १५ जागा मिळविल्या आहेत. त्यामुळे या दोन पक्षांची आघाडी होणार, हे जवळ-जवळ स्पष्टच झाले. मंगळवारी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या स्वतंत्र बैठका झाल्या. त्यानंतर काँग्रेसचे माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम, सतेज पाटील, पी. एन. पाटील, प्रल्हाद चव्हाण व राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ, के. पी. पाटील, तसेच अन्य नेत्यांची एका हॉटेलमध्ये बैठक झाली. या बैठकीत हसन मुश्रीफ यांनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला. पहिल्या वर्षी काँग्रेसचा महापौर करण्यावर सहमती झाली. त्यानंतर उपमहापौरपदासह स्थायी समिती सभापतीपद राष्ट्रवादीला देण्याचा निर्णय झाला. काँग्रेसच्या सर्वाधिक जागा असल्याने पदांच्या बाबतीत काँग्रेसला झुकते माप देण्यावर दोन्ही पक्षांत सहमती झाली, परंतु कोणती पदे कोणत्या पक्षाने घ्यायची, याचा निर्णय घेण्याचे अधिकार सतेज पाटील व हसन मुश्रीफ यांना देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी) एकूण जागा ८१नव्या सभागृहातीलकाँग्रेस-राष्ट्रवादीचे बलाबल काँग्रेस २७ अपक्ष २ राष्ट्रवादी काँग्रेस १५ एकूण सदस्यसंख्या४४काँग्रेस व राष्ट्रवादी यांची ‘नैसर्गिक मैत्री’ असून, गेल्या पाच वर्षांत महानगरपालिकेत सत्तेत राहून मोठी विकासकामे केली आहेत. त्यामुळे यावेळीही या दोन्ही पक्षांनी एकत्र राहून विकासकामे करावीत, असाच जनतेचा कौल आहे. - आमदार डॉ. पतंगराव कदम, काँगे्रस नेतेसध्या आम्ही अपूर्र्ण कामे पूर्ण करण्यावर जोर देणार आहोत. जनतेला दिलेल्या अजेंड्यानुसार कामे केली जातील.- सतेज पाटील, माजी राज्यमंत्री, काँग्रेस नेतेआम्ही कोल्हापुरात एकत्र आघाडी केली, म्हणून विदर्भाचे मुख्यमंत्री कोल्हापूरवर अन्याय करतील, निधी देणार नाहीत, पण राज्य व केंद्र सरकारकडून निधी खेचून आणण्यात आम्ही यशस्वी होऊ. - हसन मुश्रीफ, माजी मंत्री,राष्ट्रवादी काँग्रेस नेते