शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

सव्वाशे वर्षातील सर्वाधिक चक्रीवादळे यंदा अरबी समुद्रात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2019 20:19 IST

 सध्या अरबी समुद्रात लक्ष्यद्वीपजवळ एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून दुसरे विषववृत्तजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे़. या दोन्ही कमी दाबाचे क्षेत्राचे रुपांतर चक्रीवादळात होणार आहे़. त्यामुळे या वर्षात ७ चक्रीवादळे अरबी समुद्रात निर्माण झाली आहेत़. 

पुणे : यंदा भारतीय उपखंडातील बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात गेल्या सव्वाशे वर्षातील सर्वाधिक १२ चक्रीवादळे निर्माण होण्याचा प्रकार घडला. त्यातील ७ चक्रीवादळे ही अरबी समुद्रात निर्माण झाली आहेत़. एकावेळी दोन चक्रीवादळे निर्माण होण्याचे प्रकार अरबी समुद्रात यंदा दोनदा झाले आहेत़. सध्या अरबी समुद्रात लक्ष्यद्वीपजवळ एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून दुसरे विषववृत्तजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे़. या दोन्ही कमी दाबाचे क्षेत्राचे रुपांतर चक्रीवादळात होणार आहे़. त्यामुळे या वर्षात ७ चक्रीवादळे अरबी समुद्रात निर्माण झाली आहेत़. 

हवामान विभागाकडे उपलब्ध असलेल्या आकडीवारीनुसार १८९१ पासून गेल्या १२८ वर्षात प्रथमच अरबी समुद्रात इतकी चक्रीवादळे व कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाली आहेत़. यापूर्वी १९९८ मध्ये अरबी समुद्रात ६ चक्रीवादळे निर्माण झाली होती़.  अरबी समुद्रात यंदा चक्रीवादळांची संख्या वाढली असतानाच बंगालच्याउपसागरातील चक्रीवादळाच्या संख्येत मात्र घट झाली आहे़. बंगालच्या उपसागरात दरवर्षी सरासरी ४ चक्रीवादळे निर्माण होतात़. यंदा पाबुक, फनी आणि बुलबुल ही ३ चक्रीवादळे निर्माण झाली होती. मॉन्सूनपूर्व आणि मॉन्सून पश्चात याची तुलना केल्यास मॉन्सून पश्चात चक्रीवादळांची संख्या वाढली असल्याचे दिसून आले आहे.अरबी समुद्रात यंदा सर्वाधिक चक्रीवादळे निर्माण होण्यामागे प्रमुख कारण म्हणजे अरबी समुद्रातील पाण्याच्या तापमानात झालेली वाढ हे आहे़. समुद्राचे तापमान २७ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक झाल्यास गरम हवा आकाशात जाऊन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्यास पोषक वातावरण निर्माण होते़.त्यानंतर त्याचे रुपांतर चक्रीवादळात होते़ एकाचवेळी एका समुद्रात दोन वेळा दोन चक्रीवादळे तयार होण्याचा अरबी समुद्रात प्रथमच घडले आहे.२०१९ मध्ये बंगालच्या उपसागरात व अरबी समुद्रात झालेली चक्रीवादळे* अंदमान समुद्रात ४ -८ जानेवारी पाबुक चक्रीवादळ* बंगालच्या उपसागरात फनी २६ एप्रिल ते ४ मे दरम्यान फनी अति तीव्र चक्रीवादळ* अरबी समुद्रात १० ते १७ मे दरम्यान वायु तीव्र चक्रीवादळ* बंगालच्या उपसागरात ६ ते १२ ऑगस्ट अति तीव्र कमी दाबाचे क्षेत्र* अरबी समुद्रात २२ ते २५ सप्टेंबर हिक्का अतितीव्र चक्रीवादळ* अरबी समुद्रात २९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर कमी दाबाचे क्षेत्र* अरबी समुद्रात २४ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर कियार महा चक्रीवादळ* अरबी समुद्रात ३० ते ७ नोव्हेंबर दरम्यानमहा अतितीव्र चक्रीवादळ* बंगालच्या उपसागरात ५ ते ११ नोव्हेंबर दरम्यान बुलबुल चक्रीवादळ* अरबी समुद्रात विषववृत्ताजवळ २ डिसेंबरपासून अति तीव्र कमी दाबाचे क्षेत्र* अरबी समुद्रात लक्ष्यद्वीप जवळ ३ डिसेंबरपासून कमी दाबाचे क्षेत्र

टॅग्स :cycloneचक्रीवादळTemperatureतापमानSea Routeसागरी महामार्ग