शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीचा भातपिकाला फटका

By admin | Updated: July 22, 2016 01:07 IST

आंबेगाव तालुक्यात झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे तालुक्याच्या आदिवासी भागातील भातशेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले

डिंभे : मागील आठवड्यात आंबेगाव तालुक्यात झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे तालुक्याच्या आदिवासी भागातील भातशेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी भातखाचरांचे बांध वाहून गेले, तर नुकतीच उगवू लागलेली भातरोपे अतिवृष्टीमुळे सडून नुकसान झाल्याने यंदा आंबेगाव तालुक्याच्या भीमाशंकर, पाटण व आहुपे खोऱ्यांतील मोठे भातक्षेत्र लागवडीपासन वंचित राहणार आहे.आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्याच्या आदिवासी भागातील भातशेतीचे नुकसान झाले आहे. भीमाशंकर खोऱ्यातील गोहे, आहुपे व पाटण खोऱ्यांतील असाण, अडिवरे, पाटण, महाळुंगे, बेंढारवाडी येथील शेतकऱ्यांच्या भातखाचरांचे बांध फुटून ती वाहून गेली आहेत. तर पोखरी, फुलवडे, राजपूर, जांभोरी, तळेघर, कोंढवळ, आहपे, डोण, तिरपाड, न्हावेड, कोंढरे या भागात नुकत्याच उगवू लागलेल्या भातरोपांत पाणी साठल्याने कोवळी भातरोपे सडून गेली आहेत. यामुळे यंदा लागडीसाठी रोपेच उपलब्ध नसल्याने लागवड कशी करायची, ही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. याचा परिणाम तालुक्यातील एकूणच भातक्षेत्रावर होणार आहे. यामुळे यंदा आंबेगाव तालुक्यातील भातक्षेत्र लागवडीपासून वंचित राहण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. पाटाने पाणी देऊन शेतकऱ्यांनी कशीबशी भातरोपे जगवली होती. मात्र, ऐन भातरोपे उगवण्याच्या काळातच तब्बल आठवडाभर पावसाने आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात मुसळधार हजेरी लावली. भातखाचरे तुडुंब भरली. आठवडाभर रोपांतील पाणी काढून-काढून शेतकरी मेटाकुटीला आले, तरीही रोपांत तलावासारखी स्थिती निर्माण झाली. यामुळे नुकतीच उगवू लागलेली कोवळी रोपे सडून गेली आहेत. तर, अतिवृष्टीमुळे भातखाचरांचे बांध फुटून भात उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याची शेतकरी मागणी करू लागले असून, नुकसान झालेल्या शेतीची भरपायी मिळण्याची शेतऱ्यांकडून मागणी होऊ लागली आहे.>५,५०० हेक्टर क्षेत्र : लागवड घटलीआंबेगाव तालुक्यात एकूण ५,५०० हेक्टर एवढे एकूण भातक्षेत्र आहे. या क्षेत्रावर तालुक्याच्या पश्चिम भागातील आदिवासी शेतकऱ्यांचे जीवनमान अवलंबून आहे. भातशेती हेच या भागातील शेतकऱ्यांचे एकमेव व मुख्य पीक आहे. मात्र, यंदा भातपेरणीपासूनच भातशेती संकटात सापडू लागली आहे. कशाबशा शेतकऱ्यांनी भातपेरण्या केल्या होत्या, त्या वेळी शेतकऱ्यांना पावसाची अपेक्षा होती तेव्हा पाऊस झाला नाही.