शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

दारूकांडप्रकरणी उच्चस्तरीय समिती

By admin | Updated: July 14, 2015 01:51 IST

राज्यभर चर्चेचा विषय ठरलेल्या मालवणी विषारी दारूकांडप्रकरणाची चौकशी करण्यासाठी गृह विभागाला अखेर ‘मुहूर्त’ मिळाला. या दुर्घटनेमागील नेमके कारण

- जमीर काझी, मुंबईराज्यभर चर्चेचा विषय ठरलेल्या मालवणी विषारी दारूकांडप्रकरणाची चौकशी करण्यासाठी गृह विभागाला अखेर ‘मुहूर्त’ मिळाला. या दुर्घटनेमागील नेमके कारण शोधून आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी अपर मुख्य सचिव (गृह) के.पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली पाच उच्च पदस्थ सनदी अधिकाऱ्यांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. तीन महिन्यांत समितीने अहवाल सादर करायचा आहे. पावसाळी अधिवेशनात मालवणी विषारी दारूकांडप्रकरणी विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याची शक्यता असल्याने अधिवेशनापूर्वी तातडीने चौकशी समिती स्थापून सरकारने बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. राज्यभरात गावठी दारूभट्ट्यांविरुद्ध मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र शासकीय अधिकाऱ्यांच्या वरदहस्तामुळे राजरोसपणे सुरू असलेल्या विषारी दारूविक्रीमागील मुख्य सूत्रधार अद्याप पडद्याआडच आहेत.मालवणी, मालाड येथे १८ जूनला विषारी दारूकांडाचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश पाटील यांच्यासह ८ पोलिसांना निलंबित केले. तर उत्पादन शुल्क विभागाने दोघा निरीक्षकांसह चार जणांवर कारवाई केली. या प्रकरणाची व्याप्ती वाढत राहिल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार तब्बल महिन्याभरानंतर चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने १० आॅक्टोबरपर्यंत अहवाल शासनाला सादर करायचा आहे. त्यांच्या शिफारशीनुसार शासनाकडून कारवाई करण्यात येईल, असे गृह विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. - चौकशी समितीमध्ये गृह सचिव के.पी. बक्षी यांच्याशिवाय विधी व न्याय विभाग, महसूल, समाज कल्याण आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रधान सचिवांचा समावेश आहे. समितीला चौकशीच्या अनुषंगाने कोणत्याही व्यक्ती, शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्याला पाचारण करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत.