शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
3
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
4
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
5
हेमा मालिनी यांनी विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट्स, १२.५ कोटींची कमाई अन् आता...
6
Sudan Landslide: अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप
7
आजचे राशीभविष्य, ०२ सप्टेंबर २०२५: प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, स्वकियांशीच खटके उडतील
8
४ राजयोगात परिवर्तिनी एकादशी: ९ राशींचे कल्याण-भरभराट, सुबत्ता-शुभ-लाभ; धनलक्ष्मी प्रसन्न!
9
Mumbai: हायकोर्टाने मराठा आंदोलकांना खडसावले, आज दुपारपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश
10
Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानमध्ये भूकंप, ८०० जणांचा मृत्यू, २५०० हून अधिक जखमी
11
Narendra Modi: दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान मोदींचे एससीओमध्ये पाकिस्तानला खडेबोल 
12
Chhagan Bhujbal: ओबीसीत वाटेकरी नकोत; नाहीतर आम्हीही मुंबईत येऊ, छगन भुजबळांचा इशारा
13
Maratha Reservation: शहर पूर्ववत हवे, पण आंदोलकांचीही चिंता; सुनावणीदरम्यान हायकोर्ट काय म्हणाले?
14
Maratha Kranti Morcha: चार दिवसांत आंदोलकांची १० हजार वाहने मुंबईत!
15
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
16
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
17
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
18
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
19
APAAR: राज्यभरातील १ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांचे ‘अपार’ फेल
20
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?

एसटी महामंडळावर हायकोर्टाची नाराजी

By admin | Updated: January 10, 2017 04:30 IST

दारु पिऊन एसटी बस चालविणाऱ्या चालकास सेवेतून बडतर्फ न करता त्याला पगार कमी करण्याची फुटकळ शिक्षा देण्याच्या

मुंबई : दारु पिऊन एसटी बस चालविणाऱ्या चालकास सेवेतून बडतर्फ न करता त्याला पगार कमी करण्याची फुटकळ शिक्षा देण्याच्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मवाळपणावर उच्च न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले आहे.औरंगाबाद खंडपीठावरील न्यायाधीश न्या. रवींद्र घुगे यांनी म्हटले की, ६० प्रवाशांची बसण्याची आणि २० प्रवाशांची उभे राहण्याची क्षमता असलेली एसटीची बस चालकाने दारु पिऊन चालविणे ही अत्यंत गंभीर स्वरूपाची बेशिस्त आहे. अशा चालकाने अपघात करून अशा चालकाने अपघात करून लोकांचा जीव घेईपर्यंत महामंडळाने वाट पाहणे अपेक्षित नाही. याआधीही गैरवर्तनाचे तब्बल ३६ प्रकार केलेल्या या चालकास बडतर्फ न करता त्याचा केवळ पगार कमी केला जावा, हे धक्कादायक आहे. नंदूरबारच्या शहादा आगारातील बसचालक रामदास सदाराव याने केलेली रिट याचिका फेटाळताना न्या. घुगे यांनी हे मत नोंदविले. सिद्ध झालेल्या गैरवर्तनाच्या तुलनेत दिलेली शिक्षा खूपच कठोर आहे, हा सदाराव याचा युक्तिवाद फेटाळताना न्या. घुगे यांनी, अशा चालकास बडतर्फच केले जायला हवे होते, असे म्हटले. आपण दारु प्यायलो नव्हतो तर खोकल्याचे औषध घेतले, हा त्याचा बचावही अमान्य केला. (विशेष प्रतिनिधी)