शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

औषध खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचे हायकोर्टाचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2016 02:43 IST

राष्ट्रीय नागरी आरोग्य मिशन (एनयूएचएम) या योजनेसाठी केंद्र सरकारने दिलेल्या निधीतून राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने केलेली औषध खरेदी अपारदर्शी आणि भ्रष्ट

मुंबई : राष्ट्रीय नागरी आरोग्य मिशन (एनयूएचएम) या योजनेसाठी केंद्र सरकारने दिलेल्या निधीतून राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने केलेली औषध खरेदी अपारदर्शी आणि भ्रष्ट मार्गाने केली गेली आणि या औषधांचे वाटप काहीही उपयोग न होता ती वाया जातील अशा मनमानी पद्धतीन केले गेल्याचे सकृतदर्शनी दिसते, असे मत मुंबई उच्च न्यायालयाने नोंदविले आहे.दि. १२ एप्रिलपर्यंत केल्या गेलेल्या २९७ कोटी रुपयांच्या औषध खरेदीत झालेला भ्रष्टाचार व अनेक प्रकारच्या अनियमितता यावर सविस्तर प्रकाश टाकणारी ज्येष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी लिहिलेली एक वृत्तमालिका ‘दै. लोकमत’ने प्रसिद्ध केली होती. यानंतर कुलकर्णी यांनी या बातम्यांच्या कात्रणासह एक पत्र उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठास पाठविले होते. याची दखल घेत न्या. रवींद्र बोर्डे व न्या. के.के. सोनवणे यांच्या खंडपीठाने १० आॅक्टोबर रोजी हा विषय जनहित याचिका म्हणून सविस्तर सुनावणीस घेण्याचे ठरविले.कुलकर्णी यांनी पाठविलेली कात्रणे व पत्र याआधारे हा विषय जनहित याचिका म्हणून का स्वीकारण्यात येत आहे याचे विवेचन करणारे १० पानी निकालपत्रही खंडपीठाने दिले. त्यात विविध महापालिकांना त्यांच्या गरेजेहून कितीतरी जास्त औषधे पाठविली गेल्यावर ती साठविण्याची व योग्य साठवणूक न केल्याने ती वाया जाण्याची कशी परिस्थिती उद््भवली याविषयी सरकारी पातळीवर झालेल्या पत्रव्यवहाराची सविस्तर नोंद घेण्यात आली. या अनुषंगाने खंडपीठाने लिहिले की, ‘एनयूएचएम’साठी औषधे खरेदी करताना वास्तवात गरज किती आहे याची कोणतीही माहिती आधी गोळा केली गेली नाही व धरसोड पद्धतीने वारेमाप प्रमाणावर औषधे खरेदी केली गेली. यामुळे मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. औषधांच्या या वारेमाप खरेदीखेरीज या खरेदीत ज्या अनियमितता सहजपणे नजरेस पडतात त्यावरून यात भ्रष्ट मार्गांच्या अवलंब केला गेल्याचा निष्कर्ष काढणे अपरिहार्य आहे.खंडपीठ आणखी एका ठिकाणी म्हणते की, उपलब्ध माहिती पाहता खरेदी केली गेलेली औषधे आवश्यक दर्जाची नव्हती, असा निष्कर्षही अपरिहार्य ठरतो. खरेदी केलेली औषधे उपयोगात न येता वाया जातील अशा रितीने त्यांचे वाटप महापालिका व नगरपालिकांना केले गेले.या खरेदीच्या वित्तीय पैलूविषयी न्यायालय म्हणते की, ही औषधे खरेदी करण्यासाठी अवलंबिलेली प्र्रक्रियाही सरकारने स्पष्ट करणे गरजेचे आहे. असे असले तरी जी काही माहिती उपलब्ध आहे त्यावरून ही खरेदी पारदर्शी पद्धतीने न झाल्याचे दिसते. यामुळे औषधांच्या खरेदी व वाटपात वित्तीय अनियमितताही झाल्या असाव्यात असे म्हणण्यास जागा दिसते.न्यायालय म्हणते की, नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा पुरविणे हे सरकारचे कर्तव्य आहे. यात प्रशिक्षित डॉक्टर आणि कर्मचारीवर्ग तसेच औषधे या दोन्हींचा समावेश होतो. गरज नसताना वारेपाम औषधे खरेदी करणे सरकारकडे उपलब्ध असलेल्या मर्यादित साधनांचा अपव्यय आहे. (विशेष प्रतिनिधी)आरोग्यमंत्रीही प्रतिवादी१न्यायालयाने या प्रकरणात आरोग्य व कुटुंबकल्याण खात्याच्या मंत्र्यांखेरीज सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, नगरविकास आणि आदिवासी विकास या विभागाचे प्रधान सचिव आणि सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय शिक्षण या विभागांच्या संचालकांना प्रतिवादी केले. त्यांनी याचिकेतील विषयावर १८ नोव्हेंबरपर्यंत उत्तर द्यायचे आहे.२अ‍ॅड. डी. पी. पालोदकर यांना न्यायालयाने मदतीसाठी खास नेमले. ते कुलकर्णी यांनी पाठविलेल्या माहितीच्या आधारे न्यायालयाच्या ठरीव आकृतीबंधात चार आठवड्यांत औपचारिक याचिका तयार करतील.