शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

हावरे सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार

By admin | Updated: April 27, 2017 02:29 IST

इमारतीच्या बांधकामासाठी ठाण्याबाहेरुन सामान आणून ठाणे पालिकेची ५५ लाखांची जकात बुडवल्याचा आरोप असलेले विकासक

मुंबई : इमारतीच्या बांधकामासाठी ठाण्याबाहेरुन सामान आणून ठाणे पालिकेची ५५ लाखांची जकात बुडवल्याचा आरोप असलेले विकासक आणि शिर्डी साई संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांच्या हावरे इंजिनीअर्स अ‍ॅण्ड बिल्डर्स प्रा.लि.ला दंडासह पाच कोटी ५१ लाख रुपये एका आठवड्यात निबंधकाकडे जमा करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी दिले होते. या निर्णयाविरुद्ध हावरे यांनी योग्य न्याय न मिळाल्यास सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली जाईल, असे स्पष्ट केले आहे. ठाणे येथील इमारतींच्या बांधकामांसाठी लागणाऱ्या सर्व सामानांचे कंत्राट आम्ही पुरवठादारांना दिलेले होते. सामानाचा पुरवठा करताना जकात आणि सर्व कर भरण्याची जबाबदारी ही पुरवठादारांची होती. तसा आम्ही लेखी करार केला होता. जकात नाक्यावर पालिकेची जकात वसुली यंत्रणा तैनात होती. परंतु काही पुरवठादारांनी जकात कर न भरता सामानाचा पुरवठा केला, असे गृहीत धरुन वसुली विकासकाकडून करण्याचा प्रयत्न पालिकेने केला. जकात भरण्याची जबाबदारी ही पुरवठादारांची होती. तरीही वसुलींचा तगादा आमच्याकडे लावण्यात आला, असे हावरे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.सुरुवातीला जकात फक्त पाच लाख रुपये एवढाच होता. परंतु तो फुगवून ५५ लाख करण्यात आला. योग्य न्यायनिवाडा न करता १0 पट दंड लावून ५ कोटी ५१ लाखांची वसुली पालिकेने काढली. यावर आम्ही पालिकेतही अपील केले. ५५ लाखांपैकी अर्धी रक्कम पालिकेकडे जमा करून दंड माफीची विनंती केली. याशिवाय ५ कोटी ५१ लाख रुपये किंमतीची मालमत्ता गॅरंटी म्हणून गहाणही ठेवली. मात्र ५ लाख रुपये जकातीच्या जागी साडे पाच कोटींची वसुली करणे हे अन्यायकारक असल्याचे त्यांनी सांगितले. ठाण्याच्या राजू के. यांनी उच्च न्यायालयात याप्रकरणी जनहित याचिका दाखल केली. सुनावणीत न्यायालयाने हावरे यांना २ मे पर्यंत पाच कोटी ५१ लाख रुपये भरण्याचे आदेश दिले. एवढे वर्ष जकात कराची वसुली का करण्यात आली नाही, याचे स्पष्टीकरण देण्यासाठी ठाणे महापालिकेच्या आयुक्तांनाही हजर राहण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)