शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ नोटीसला उच्च न्यायालयाची स्थगिती

By admin | Updated: June 7, 2017 04:39 IST

महामार्गाच्या ५०० मीटर अंतरावर असलेल्या पुण्याच्या तीन क्लबना दारू न विकण्यासंदर्भात राज्य सरकारने नोटीस बजावली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महामार्गाच्या ५०० मीटर अंतरावर असलेल्या पुण्याच्या तीन क्लबना दारू न विकण्यासंदर्भात राज्य सरकारने नोटीस बजावली आहे. मंगळवारी उच्च न्यायालयाने या क्लबना तात्पुरता दिलासा देत राज्य सरकारच्या नोटीसला अंतरिम स्थगिती दिली आहे. ब्रह्माकॉर्प क्लब, लेडिज क्लब आणि दोराबजी शॉप या तीन क्लबना राज्य उत्पादन शुल्क विभागाने १८ मे रोजी नोटीस बजावून दारूची विक्री करण्यास मनाई केली. सरकारच्या म्हणण्यानुसार, हे तिन्ही क्लब महामार्गाच्या ५०० मीटर अंतरात आहेत. सरकारच्या या नोटीसला तिन्ही क्लबनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्या. शंतनू केमकर व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे या याचिकांवर सुनावणी होती.डिसेंबर २०१६मध्ये सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय व राज्य महामार्गाच्या ५०० मीटर अंतरावरील दारूची दुकाने बंद करण्याचा आदेश सर्व राज्यांना दिला. या आदेशाची अंमलबजावणी करत राज्य सरकारने संबंधित क्लबना नोटीस बजावली.याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील प्रसाद ढाके-फाळके यांनी हे तिन्ही क्लब महामार्गाच्या ५०० मीटर अंतरावर नसल्याची माहिती खंडपीठाला दिली. ‘हे तिन्ही क्लब पुण्याच्या बंद रोडवर आहेत आणि हा रोड महामार्गाच्या जवळ नाही,’ असे ढाके-फाळके यांनी खंडपीठाला सांगितले.तर राज्य सरकारने हा बंद रोडच महामार्ग असल्याचे खंडपीठाला सांगितले. ‘बंद रोड महामार्ग आहे, हे सिद्ध करण्यासाठी यासंदर्भात काढलेली अधिसूचना तुमच्याकडे (राज्य सरकार) आहे का?’ असे म्हणत खंडपीठाने नोटीसला स्थगिती दिली. तसेच हे तिन्ही क्लब सुरू करण्याचा आदेश सरकारला दिला.