शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

संरक्षक भिंत तोडण्यास हायकोर्टाची स्थगिती

By admin | Updated: August 21, 2016 02:11 IST

कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंडभोवती असलेली संरक्षक भिंत तोडण्याचा आदेश उच्च न्यायालयाने काही महिन्यांपूर्वी दिला होता. मात्र शुक्रवारी उच्च न्यायालयाने या आदेशाला स्थगिती

मुंबई : कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंडभोवती असलेली संरक्षक भिंत तोडण्याचा आदेश उच्च न्यायालयाने काही महिन्यांपूर्वी दिला होता. मात्र शुक्रवारी उच्च न्यायालयाने या आदेशाला स्थगिती दिल्यामुळे महापालिकेला दिलासा मिळाला आहे.उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशावर पुन्हा एकदा विचार करावा, यासाठी महापालिकेने उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीत उच्च न्यायालयाने जून २०१६मध्ये दिलेल्या आदेशाला स्थगिती दिली.२०१३मध्ये केंद्रीय पर्यावरण व वन विभागाने महापालिकेला कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंडभोवती घातलेली संरक्षक भिंत पाडण्याचा आदेश दिला. केंद्र सरकारच्या आदेशाला महापालिकेने उच्च न्यायालयात आव्हान दिले. मात्र उच्च न्यायालयानेही महापालिकेने बेकायदेशीररीत्या संरक्षक भिंत उभारल्याचे निरीक्षण नोंदवत भिंत पाडण्याचा आदेश महापालिकेला दिला. त्याविरुद्ध महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने महापालिकेला उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याची मुभा दिली. कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंडची ५२ हेक्टर जागा सीआरझेडमध्ये मोडते. संरक्षक भिंत पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या ठिकाणी उभारल्याने या ठिकाणील खारफुटी नष्ट झाली आहे, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने आदेश देताना नोंदवले होते. सीआरझेडमध्ये कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यास मनाई असतानाही महापालिकेने कायद्याचे उल्लंघन केले. मात्र महापालिकेने या भागात अतिक्रमण होऊ नये, यासाठी संरक्षक भिंत घातल्याचे स्पष्टीकरण उच्च न्यायालयाला दिले. मात्र उच्च न्यायालयाने महापालिकेने उभारलेली संरक्षक भिंत बेकायदेशीर असून, तीन महिन्यांत पाडण्याचा आदेश जून २०१६मध्ये दिला होता. (प्रतिनिधी)नियम काय आहे...- केंद्र सरकारने महापालिकेला कचऱ्याचे विघटन करण्यासाठी आणि डम्पिंग ग्राउंडमध्ये वाहने जाण्याकरिता रस्ता उपलब्ध करण्यासाठी ६५ हेक्टर जागा वापरण्याची परवानगी दिली होती. मात्र महापालिकेने संपूर्ण डम्पिंग ग्राउंडभोवती संरक्षक भिंत उभारली.