शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

तपासावर उच्च न्यायालय समाधानी

By admin | Updated: April 26, 2017 02:27 IST

सेक्स व ड्रग रॅकेट चालवणाऱ्या शिफु सनकृती पंथाबाबत पोलिसांनी केलेल्या तपासावर मंगळवारी उच्च न्यायालयाने समाधान व्यक्त केले.

मुंबई : सेक्स व ड्रग रॅकेट चालवणाऱ्या शिफु सनकृती पंथाबाबत पोलिसांनी केलेल्या तपासावर मंगळवारी उच्च न्यायालयाने समाधान व्यक्त केले. पोलिसांनी सादर केलेला अहवाल वाचत उच्च न्यायालयाने ही ‘धक्कादायक माहिती’ असल्याचे म्हटले. सोशल साईट्सद्वारे तरुणींना आपल्या जाळ्यात ओढणाऱ्या शिफु सनकृतीविरुद्ध एका सनदी लेखापालाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या सनदी लेखापालांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या दोन्ही मुलींना या पंथाच्या लोकांनी ड्रग्स देऊन आपल्या प्रभावाखाली आणले आहे. मुलींना फसवून त्यांच्याद्वारे सेक्स व ड्रग्स रॅकेट चालवण्यात येते. या पंथाचा प्रमुख सुनील कुलकर्णी असून, तो डॉक्टर व मानसोपचारतज्ज्ञ असल्याचा दावा करतो. डिसेंबर २०१६मध्ये याबाबत पोलिसांकडे तक्रार करूनही पोलिसांनी एफआयआर नोंदवून न घेतल्याबद्दल गेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने पोलिसांना धारेवर धरले होते. उच्च न्यायालयाच्या फटकाऱ्यानंतर पोलिसांनी २० एप्रिल रोजी कुलकर्णीवर गुन्हा नोंदवला व अटक केली. सध्या कुलकर्णी पोलीस कोठडीत आहे. मंगळवारच्या सुनावणीत गुन्हे अन्वेषण विभागाने न्या. रणजीत मोरे व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठापुढे सीलबंद अहवाल सादर केला. त्या वेळी ‘आम्ही अहवाल वाचला. तपास सुरू आहे. आम्ही तपासाबाबत समाधानी आहोत. तपासात काही धक्कादायक माहिती आहे, त्यामुळे आणखी तपास करणे आवश्यक आहे,’ असे म्हणत खंडपीठाने या याचिकेवरील पुढील सुनावणी ७ जून रोजी ठेवली. दरम्यान, लेखापालांच्या मुलींनीही या खटल्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यावर खंडपीठाने यासंदर्भात अर्ज दाखल करा, मगच अर्ज स्वीकारायचा की नाही, यावर निर्णय घेऊ, असे मुलींना सांगितले. (प्रतिनिधी)