शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पबाधितांना उच्च न्यायालयाचा दिलासा

By admin | Updated: July 8, 2017 04:28 IST

दोन दशकांपूर्वी किंवा त्याहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या प्रकल्पबाधित, भूसंपादनाच्या केसेस जलदगतीने निकाली काढण्याचे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दोन दशकांपूर्वी किंवा त्याहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या प्रकल्पबाधित, भूसंपादनाच्या केसेस जलदगतीने निकाली काढण्याचे उच्च न्यायालयाच्या विचाराधीन आहे. त्या दिशेने न्यायालयाने पाऊलही उचलले आहे. न्यायालयाने निबंधकांना व सरकारी वकिलांना भूसंपादनाच्या, प्रकल्पबाधितांच्या प्रलंबित असलेल्या केसेसची यादी देण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व माहिती उपलब्ध झाल्यावर या केसेस एकाच खंडपीठाकडे वर्ग करण्यात येतील. न्यायालयाच्या अंदाजानुसार ३,००० ते ४,००० केसेस अद्याप प्रलंबित आहेत. पवना धरण प्रकल्पबाधितांनी राज्य सरकारने आर्थिक साहाय्य किंवा त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे, यासाठी अ‍ॅड. उदय वारुंजीकर यांच्याद्वारे उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. गेली कित्येक वर्षे या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. मात्र एकट्या पुण्यात २९ प्रकल्पग्रस्तांनी राज्य सरकारविरुद्ध याचिका दाखल केल्याची बाब शुक्रवारी न्यायालयाच्या निदर्शनास आली. त्यावर न्यायालयाने संपूर्ण राज्यभरातून दाखल केलेल्या अशा केसेसची आकडेवारी ३,००० ते ४,००० असण्याची शक्यता वर्तवली.‘पुण्याच्या २९ प्रकल्पबाधितांबाबत सरकारी वकिलांनी सूचना घ्यावी. तसेच आतापर्यंत भूसंपादन, प्रकल्पबाधित, पुनर्वसन आणि नुकसानभरपाईच्या किती केसेस न्यायालयात प्रलंबित आहेत, याचीही माहिती सरकारी वकिलांनी द्यावी. त्याशिवाय निबंधकांनीही यासंबंधीची सर्व माहिती मागवावी,’ असे निर्देश न्यायालयाने दिले.या सर्व केसेसची माहिती मिळाल्यावर सर्व केसेस एकाच खंडपीठापुढे सुनावणीसाठी ठेवू, असेही न्यायालयाने म्हटले. न्यायालयाच्या या निर्देशामुळे गेली कित्येक वर्षे प्रलंबित असलेल्या या केसेसमधील पक्षकारांना दिलासा मिळणार आहे.न्यायालयाच्या मदतीसाठी वकीलही सरसावलेहजारो केसेस दोन दशकांहून प्रलंबित असल्याने न्यायालयाच्या मदतीसाठी ४० वकील सरसावले आहेत. हे वकील न्यायालयाला केसेस निकाली काढण्यासाठी मदत करतील. मदत करण्यास इच्छुक असलेल्या वकिलांची यादी न्यायालयापुढे सादर करण्यात आली आहे.