शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

हायपरसिटीला उच्च न्यायालयाचा दिलासा

By admin | Updated: July 1, 2016 04:27 IST

वाशीमधील इनआॅर्बिट मॉलमध्ये हायपरसिटीची शाखा बेकायदेशीरपणे चालवण्यात येत असल्याने नवी मुंबई महापालिकेने ही शाखा एका रात्रीत सील केली.

मुंबई : वाशीमधील इनआॅर्बिट मॉलमध्ये हायपरसिटीची शाखा बेकायदेशीरपणे चालवण्यात येत असल्याने नवी मुंबई महापालिकेने ही शाखा एका रात्रीत सील केली. मात्र गुरुवारी उच्च न्यायालयाने एनएमएमसीच्या नोटीसला स्थगिती दिल्याने पुन्हा हायपरसिटीची शाखा ग्राहकांसाठी सुरू होणार आहे.‘मॉलला एफएसआय मिळालेला आहे. या एफएसआयचा वापर व्यावसायिक कारणासाठी केला जाऊ शकतो. त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या इनआॅर्बिट मॉलने महापालिकेकडून घेतल्या आहेत. महापालिका दावा करत असल्याप्रमाणे हायपरसिटी तळघरात नसून तळमजल्यावर आहे. त्यामुळे महापालिकेने बजावलेली नोटीस रद्द करावी,’ असा युक्तिवाद इनआॅर्बिट मॉलतर्फे ज्येष्ठ वकील मिलिंद साठे यांनी केला. पालिकेने यावर आक्षेप घेतला. ‘पालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार, तळघराचा वापर पार्किंग किंवा स्टोअररूमसाठी करण्याची परवानगी आहे. मात्र तळघराचा व्यावसायिक वापर करण्यास मनाई आहे. त्यामुळे मॉलकडे सर्व परवानग्या असल्या तरी तळघराचा वापर दोन गोष्टींकरिता मर्यादित आहे. डीसीआरचे उल्लंघन केल्याने महापालिकेने संबंधित आउटलेट सील केले,’ असा युक्तिवाद पालिकेच्या वकिलांनी केला. ‘२००८ पासून हे सुरू आहे. तेव्हापासून तुम्ही काय करत आहात? परवानग्या तर तुम्हीच दिल्यात. एवढी वर्षे सुरू असलेली शाखा आता आणखी काही दिवस सुरू राहू द्या,’ असे म्हणत न्यायालयाने नोटिसीला स्थगिती देत ही याचिका अंतिम सुनावणीसाठी ठेवली. (प्रतिनिधी)