शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारला हायकोर्टाने सुनावले

By admin | Updated: April 5, 2016 02:17 IST

मंत्रालय व नेत्यांच्या बंगल्यांच्या नूतनीकरणासाठी राज्य सरकारकडे पुरेसा पैसा आहे. मात्र न्यायालयांच्या इमारतींचे नूतनीकरण किंवा पुनर्बांधणीसाठी राज्य सरकारकडे पुरेसा निधी नाही

मुंबई : मंत्रालय व नेत्यांच्या बंगल्यांच्या नूतनीकरणासाठी राज्य सरकारकडे पुरेसा पैसा आहे. मात्र न्यायालयांच्या इमारतींचे नूतनीकरण किंवा पुनर्बांधणीसाठी राज्य सरकारकडे पुरेसा निधी नाही, ही अत्यंत लज्जास्पद बाब आहे, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले. उच्च न्यायालयाने नेत्यांसह त्यांच्या सचिवांनाही फैलावर घेतले. सचिवांना सर्व स्थिती माहीत असते, फक्त आपल्या ‘नेत्या’ला नाही म्हणण्याचे धाडस त्यांनी करावे, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने सचिवांवरही टीका केली.मोडकळीस आलेल्या माझगाव न्यायालयाची इमारत तीन वर्षे झाली तरी पाडण्यात आली नाही. त्यासाठी पुरेशा निधीचीही तरतूद करण्यात आली नसल्याने उच्च न्यायालय संतप्त झाले. माझगाव न्यायालयाची इमारत धोकादायक असल्याने २०१३मध्ये ती रिकामी करण्यात आली; मात्र ही इमारत अद्याप पाडण्यात आलेली नाही.या इमारतीचे बांधकाम जलदगतीने पूर्ण करण्यात यावे, यासाठी माझगाव बार असोसिएशनने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. गिरिश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे होती.‘आम्ही याबाबत समाधानी नाही. अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने निधी मंजूर करत राहिलात तर २०२० किंवा २०२३पर्यंत इमारतीचे बांधकाम पूर्ण होणार नाही. तीन वर्षे उलटूनही अद्याप इमारत पाडण्यात आली नाही? जिल्हा न्यायालयातील महिला न्यायाधीश व पक्षकारांसाठी शौचालये नाहीत. त्यांची बिकट अवस्था आहे. तुम्हाला याबद्दल काहीच वाटत नाही?’ अशीही चपराक खंडपीठाने सरकारला लगावली. (प्रतिनिधी)