शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

उच्च न्यायालय : ‘त्या’ डॉक्टरांसाठी स्वतंत्र योजना आखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 07:00 IST

आदिवासी व दुर्गम भागात डॉक्टरांनी सराव करावा, यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र व आकर्षक योजना आखणे आवश्यक आहे, अशी सूचना उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सोमवारी केली.

मुंबई  - आदिवासी व दुर्गम भागात डॉक्टरांनी सराव करावा, यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र व आकर्षक योजना आखणे आवश्यक आहे, अशी सूचना उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सोमवारी केली.राज्यातील दुर्गम व आदिवासी विभागांत राहणाऱ्या मुलांमध्ये कुपोषणाचे प्रमाण अधिक असल्याने राज्य सरकारला यावर ठोस योजना आखण्याचा आदेश द्यावा, अशी विनंती करणाºया काही जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवरील सुनावणी न्या. नरेश पाटील व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे होती.आदिवासी व दुर्गम भागात डॉक्टर जायला अनेकदा डॉक्टर तयार होत नसल्याचे चित्र पाहायला मिळते. इतकेच नव्हे तर डॉक्टरांची या भागात बदली केल्यास उच्च न्यायालयात आव्हान देण्यात येते किंबा बदली नाकारली जाते, अशी माहिती सरकारी वकील नेहा भिडे यांनी न्यायालयाला दिली.जास्त वेतन द्याडॉक्टरांनी आदिवासी व दुर्गम भागात काम करावे, असे वाटत असेल तर त्यांच्यासाठी स्वतंत्र योजना आखा. ही योजना आकर्षक असली पाहिजे. त्याशिवाय डॉक्टरांना सर्व सोयी-सुविधा पुरवा, अशी सूचना राज्य सरकारला केली.राज्यात डॉक्टरांची कमतरता असली तर अन्य राज्यांतील डॉक्टर सेवेत रुजू करून घ्या. तसेच जी चॅरिटेबल रुग्णालये आहेत, त्यांना अन्य वैद्यकीय केंद्रांना मदत करण्याचे आवाहन करा, खासगी रुग्णालयांच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांची बैठक घ्या.याशिवाय आदिवासी व दुर्गम भागात काम करणाºया डॉक्टरांना जास्त वेतन द्या. त्यांना सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून द्या, असे निर्देश न्यायालयाने सरकारला दिले. या याचिकेवरील पुढील सुनावणी १९ जून रोजी ठेवण्यात आली आहे.

टॅग्स :docterडॉक्टरHigh Courtउच्च न्यायालय