शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिकेला उच्च न्यायालयाचा दणका

By admin | Updated: June 24, 2017 03:57 IST

नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा करण्यास सक्षम नसलेल्या पुणे व ठाणे महापालिकेला उच्च न्यायालयाने दणका दिला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा करण्यास सक्षम नसलेल्या पुणे व ठाणे महापालिकेला उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. पुण्याच्या बाणेर व बालेवाडी परिसरात नव्या बांधकामांना तात्पुरती स्थगिती दिली आहे. ठाण्यातील घोडबंदर परिसरातील नव्या बांधकामांना दिलेल्या स्थगितीत वाढ केली आहे.न्यायालयाने या दोन्ही महापालिकांना या परिसरात सध्या किती नवी बांधकामे बांधण्यात येत आहेत, संबंधित बांधकामांसाठी घरगुती वापराचे पाणी वापरण्यात येते की बोअरवेलचे पाणी वापरण्यात येते, याबाबत तपशिलात माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत. बाणेर व बालेवाडी परिसरातील नागरिकांना कोट्यवधी रुपये खर्च करून पाण्याचे टँकर खरेदी करावे लागतात. त्यामुळे महापालिकेला येथील नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा करण्याचा आदेश द्यावा, अशी विनंती करणारी जनहित याचिका अमोल बालवडकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. ठाण्याच्या मंगेश शेलार यांनीही घोडबंदर परिसरातील नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा करण्यात येत नसल्याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकांच्या सुनावणीत न्यायालयाने गुरुवारी दोन्ही महापालिकांना नागरिकांना पुरेसे पाणी पुरविण्यात येते की नाही, याबाबत विचारणा केली. त्यावर महापालिकांच्या वकिलाने पावसाळा असल्याने नागरिकांना मुबलक पाणी उपलब्ध होईल, असे आश्वासन न्यायालयाला दिले. बाणेर व बालेवाडीची लोकसंख्या १ लाख १० हजार आहे. त्यानुसार, त्यांना १६५ लाख लीटर पाणी मिळणे आवश्यक आहे. मात्र, महापालिका केवळ ६० लाख लीटर पाणी पुरवत आहे, असे अ‍ॅड. अनुराग जैन यांनी न्यायालयाला सांगितले.‘आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा बंद करणे अयोग्य आहे. महिन्यातून एकदा पाणीपुरवठा बंद करणे, आम्ही समजू शकतो,’ असे न्यायालयाने म्हटले. ‘आम्हाला सध्या किती नवी बांधकामे या परिसरात सुरू आहेत, याची आकडेवारी द्या, तसेच या बांधकामांसाठी बोअरवेल की घरगुती वापराचे पाणी वापरण्यात येते, तेही सांगा. तुम्ही (महापालिका) दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक पाणी विकासक वापरतो का, याचीही माहिती आम्हाला द्या,’ असे निर्देश देत, या दोन्ही याचिकांवरील सुनावणी एका आठवड्याने ठेवली आहे. ठाण्यातील घोडबंदर परिसरातील नव्या बांधकामांना दिलेल्या स्थगितीत वाढ केली आहे. ठाण्याच्या मंगेश शेलार यांनीही घोडबंदर परिसरातील नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा करण्यात येत नसल्याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दोन्ही याचिकांवरील सुनावणी एका आठवड्याने ठेवली आहे.अमोल बालवडकर यांच्यातर्फे अ‍ॅड. अनुराग जैन यांनी बाणेर व बालेवाडी परिसरातील नागरिकांना १०५ लाख लीटर पाण्याचा तुटवडा असल्याचे न्यायालयाला सांगितले. केंद्र सरकारच्या मागदर्शक तत्त्वानुसार दरडोई १५० लीटर पाणी देणे बंधनकारक आहे.