शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

इंटरनेटमुळे पीएमपी होणार ‘हायटेक’

By admin | Updated: May 18, 2016 01:02 IST

तब्बल ५० टक्के आयुर्मान संपलेल्या बसच्या भरवशावर पीएमपीचा कारभार सुरू

पुणे : तब्बल ५० टक्के आयुर्मान संपलेल्या बसच्या भरवशावर पीएमपीचा कारभार सुरू असला तरी, प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी पीएमपी प्रशासनाने कंबर कसली आहे. पीएमपीच्या सर्व १२०० बसला जीपीएस यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर, पीएमपीचे सर्व डेपो आणि बसस्थानकांवर पुढील तीन महिन्यांत वाय-फाय सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्या पुढे जाऊन येत्या सहा महिन्यांत प्रत्येक बसमध्ये प्रवाशांना मोफत वाय-फाय सुविधाही दिली जाणार आहे. त्यामुळे एकीकडे १० वर्षांहून अधिक वयोमान झालेल्या बसेसची सीट, खिडक्या, दरवाजे, काचा खिळखिळ्या झाल्या असल्या तरी प्रत्येक प्रवाशाला स्मार्ट फोनसाठी इंटरनेटची सुविधा मात्र खात्रीशीर उपलब्ध होणार आहे. पीएमपीच्या या १२०० बसमध्ये वाय-फाय मोफत उपलब्ध करून देण्यासाठी चीनच्या अल्ट्रा पॉवर सॉफ्टवेअर या कंपनीने पुढाकार घेतला असून कंपनीच्या शिष्टमंंडळाने सोमवारी (दि. १६) पीएमपीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून, लवकरच निर्णय होणार आहे.>प्रत्येक बसमध्ये जीपीएस पीएमपीकडून प्रत्येक बसमध्ये जीपीएस यंत्रणा बसविली जाणार आहे. त्यामुळे शहरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसचे नेमके ठिकाण समजण्यास मदत होणार आहे. या शिवाय प्रत्येक प्रवाशालाही बस ट्रँकिंग करणे सहज शक्य होणार आहे. त्यामुळे घरबसल्या बसस्थानकावर बस कधी येईल, आपल्या निश्चित ठिकाणी जाण्यासाठी किती वेळ लागेल, याची माहितीही एका क्लिकवर प्रवाशांना तसेच प्रशासनालाही मिळणे शक्य होईल.>लवकरच मोबाईल अँपपीएमपीकडून प्रवाशांसाठी मोबाईल अ‍ॅपही विकसित करण्यात आले आहे. या अ‍ॅपचे काम पूर्ण झाले असले तरी अद्याप पीएमपीच्या बसेसमध्ये जीपीएस यंत्रणा बसविण्याचे काम पूर्ण झाले नसल्याने ते सुरू करण्यात आलेले नाही. या अ‍ॅपमध्ये प्रवाशांना प्रत्यके बसची इत्थंभूत माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. तसेच पीएमपी संबंधातील सूचना व तक्रारीही सहज आणि सोप्या स्वरूपाय करता येणार आहे. बहुतांश प्रवाशांकडे स्मार्टफोन असल्याने याचा मोठ्या प्रमाणात वापर होण्याचा प्रशासनास विश्वास आहे.>डेपो आणि स्थानके महिन्याभरात वाय-फायपीएमपीचे सर्व डेपो आणि स्थानके महिन्याभरात वाय-फाय होत आहेत. या प्रकल्पाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले असून, स्वारगेट परिसरात तीन ठिकाणी ही इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, पुढील महिन्याभरात सर्व बीआरटी मार्ग तसेच वर्दळीच्या १२० स्थानकांवर मोफत वाय-फाय सुविधा सुरू केली जाणार आहे.प्रत्येक बसमध्ये वाय-फायपीएमपीकडून पुढील सहा महिन्यांत प्रत्येक बसमध्ये वाय-फाय सुविधा देण्यात येणार आहे. त्यासाठी चीनच्या कंपनीने प्रशासनाशी चर्चा केली असून, प्राथमिक स्वरूपात याबाबत सकारात्मकता दर्शविण्यात आली आहे. त्यानुसार, कंपनीस प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, येत्या गुरुवारी (दि. १९) याबाबत पुन्हा बैठक होणार आहे. या कंपनीकडून ही सेवा मोफत पुरविली जाणार असून, सहा महिन्यांत १२०० बसेसमध्ये ती कार्यरत करणे शक्य असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येक बसमध्ये प्रवाशाला मोफत इंटरनेट वापरता येणार आहे.