शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
3
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
4
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
5
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
6
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
7
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
8
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
9
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
10
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
11
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
12
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
13
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
14
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
15
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
16
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
17
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?
18
Amazon.in च्या 'ग्रेट सेव्हिंग्ज सेलिब्रेशन' स्टोअरफ्रंटसह GST बचतीचा धमाका
19
तू परत आलास..?? IND vs PAK Final वरून पाकिस्तानची खिल्ली उडवणाऱ्या भन्नाट मीम्सचा पाऊस
20
Vodafone-Idea च्या शेअरमध्ये मोठी घसरण, AGR प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑक्टोबरला

अरे, उठाऽऽ उठाऽऽ दिवाळी आली..!

By admin | Updated: October 20, 2014 22:28 IST

सरकारनामा

श्रीनिवास नागेधडाऽऽड धूऽऽम : औट, सुतळी बॉम्ब, लक्ष्मी तोटे-चिमणी तोटे, भुईनळे, बाण, लवंगी फटाके उडू लागले!दारावर टकटक झाली आणि ‘उठा उठाऽऽ दिवाळी आली, अभ्यंगस्नानाची वेळ झाली!’ अशी हाक ऐकू आली. संजयकाकांना हे नवीनच होतं. अभ्यंगस्नान (कुठनं काढलाय राव हा शब्द? म्हणताना जिभेचे तुकडे पडताहेत!) ही काय भानगड, बघूया तरी, म्हणून ते उठलेच. (हल्ली संघवाल्यांच्या संगतीनं काय-काय करायला लागतंय, नाही?) बघतात तो समोर ‘कमळ’ छाप उटणं आलं. सोबत नरेंद्रभाई-अमितभाई कंपनीचा सुवासिक साबण. गुलालानं माखलेल्या काकांनी उटणं लावलं. खसाखसा साबण लावून कढत पाण्यानं आंघोळ (नव्हे अभ्यंगस्नान...) केली. जगतापसाहेब, सुधीरदादा, खाडे यांनी पाण्याच्या घंगाळाखाली जाळ लावला होता. (नाईकसाहेब मात्र राजूभार्इंना ‘नाग’ छाप तेल देत होते. ते काकांकडं फिरकलेही नाहीत म्हणे!)काकांनी कुर्ता चढवला, तोच कानठळ्या बसवणारा आवाज झाला. ‘कोण रे त्यो?’ असं विचारत काका पुढं आले, पण तिथंच थिजले. आबांनी कवठेएकंदचे औट लावायला सुरुवात केली होती. त्या आवाजानं कानाला दडे गेल्यानं घोरपडे सरकारांनी कधीचाच पळ काढला होता. ‘काका, मला वाचवाऽऽ’ म्हणायलाही त्यांना वेळ मिळाला नाही!! आबांची दिवाळी बघून ‘आता पाच वर्षं परत ह्येचं औट ऐकायचं... ह्यो तेवढा पडायला पाह्यजे होता रे...’ असं म्हणत काकांनी बसकण मारली. तेवढ्यात ‘सण्णऽऽऽ’ करत कानाजवळून बाण गेला. अनिलभाऊंनी एका हातात धनुष्यबाण घेऊन दुसऱ्या हातातनं सोडलेले रॉकेट बाण, भुईनळे पार खानापुरातनं तासगावपर्यंत फिरत होते. काकांनी निरखून बघितलं, भाऊंनी बाण उडवण्यासाठी ‘अंजनी मेड बॉटल’ वापरली होती. कोपऱ्यात उभं राहून सुभाषआप्पा फुगे फोडत होते. त्या फुग्यांचा आवाजही फटाक्यांच्या माळांसारखा येत होता. अनिलभाऊंचे बाण टोपी आणि गोपी यांच्या गोटात घुसत होते. गोपीकडं दिलेल्या कमळाच्या पार चिंध्या झाल्या होत्या. टोपीही काळवंडली होती.तिकडं कदमसाहेबांचे सुतळी बॉम्ब पलूस-कडेगावमध्ये फुटत होते, पण त्यांचा आवाज जिल्हाभर घुमत होता. टेंभूचे फुसके बार घेऊन पृथ्वीराजबाबा कमळाच्या तलावाभोवती फिरत होते. शेवटी सगळे बार फुसके निघाल्यानं त्यांनी ते तलावात टाकून दिले.‘आता आम्हीबी दाखवतो,’ असं म्हणत काकांनी इशारा केला. त्यावर जगतापसाहेबांनी तोटे लावले. धडाऽऽड धूऽऽम... या तोट्यांचा आवाज तासगाव आणि पलूस-कडेगावपर्यंत गेला. तो ऐकताच कदमसाहेबांनी पाहुण्यांकडच्या सावंतांच्या पोराला गावाकडं जायला सांगितलं. आबा मात्र शेंडग्यांच्या प्रकाशअण्णांना हुडकत होते. प्रकाशअण्णांनी केव्हाच मुंबईची गोदी गाठली होती. पुन्हा कधीही जतला यायचं नाही, असं ठरवून!दिवाळीत असा रंग चढत असताना इस्लामपूरकर कसे मागे राहतील! त्यांनी पंच्याहत्तर हजाराची माळच लावली. त्या फटक्यांनी ‘एकास एक’ म्हणणाऱ्यांची पळता भुई थोडी झाली! प्रतीकदादा तर गायबच झाले, पण राजूभाई आणि सदाभाऊही उसाच्या फडात लपून बसले. अभिजितआबा आणि जितेंदरला इस्लामपूरकरांनी पळवून लावलं होतं. जितेंदरनं मनोमन ठरवलं की, बोरगाववरनं हायवेकडं जाताना इस्लामपूर ओलांडायचं नाही... आणि अभिजितआबांनी निश्चय केला की, चिकुर्डेकडनं वाळव्यात जाताना इस्लामपूरमार्गे न जाता येलूर, कामेरीमार्गे रानातनं जायचं! महाडिक कंपनीनं मात्र हुशारीनं इस्लामपूर सोडून शिराळ्याचा रस्ता धरला. तिथं नाईकसाहेब ‘झाड’, ‘भुईनळे’ लावत होते. लख्खं प्रकाशानं सगळं उजळून निघत होतं. महाडिक कंपनीनं फुलबाजे हातात घेऊन फिरवायला सुरुवात केली. दोघा भाऊंच्या (मानसिंग आणि सत्यजित हो!) लवंगी फटाक्यांच्या माळा आधीच विझल्या होत्या. (इस्लामपूरकरांनी कुणाच्या माळांना बत्ती दिली आणि कुणाच्या माळांची वात काढली, हे मात्र दोघा भाऊंना अजून समजलेलं नाही.)खाडेंनी मिरजेत ‘लक्ष्मी’ तोटे, ‘चिमणी’ तोटे लावले होते. तेवढ्या आवाजानंही जाधव मास्तर, सांगलीकर वकील आणि होनमोरे खुर्चीखाली दडून बसले. जाधव मास्तर आणि सांगलीकर वकील अजूनही एकमेकांची कशी जिरवली, या अविर्भावात होते. (त्यांना काय माहीत, की जिरवाजिरवीत आपलीच जिरली ते!) मदनभाऊ सांगलीतल्या बंगल्यात भुईचक्र लावून त्याभोवती स्वत:च गरगर फिरत होते. सगळ्यांनीच असं कसं फिरवलं? इस्लामपूरकरांची ‘गेम’ लक्षात कशी आली नाही? आपल्या पप्पूनं दगा का दिला? तीन नंबरवरचं ‘कमळ’ वर आलंच कसं? हे प्रश्नही त्यांच्या डोक्यात गरगर फिरू लागले. मग त्यांनी आणखी भुईचक्रं लावली. ती बंगल्यातनं बाहेर रस्त्यावर गेली आणि खड्ड्यांमध्ये रूतून बसली. ‘महापालिकेनं रस्त्यांची पार वाट लावलीय...’ असं ते म्हणाले, पण लगेच जीभ चावली. महापालिका तर आपल्याच ताब्यात असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.संभाजीआप्पांनी सांगलीच्या मारुती चौकात फटक्यांच्या माळा मागवल्या होत्या. त्यातल्या काही प्रतीकदादांनीच दिल्या होत्या म्हणे! पण सराफकट्ट्यावरनं रंगीबेरंगी भुईनळे आकाशात उडू लागल्याचं दिसताचं आप्पांनी पृथ्वीराजभैय्याला सगळ्या माळा वखारभागात न्यायला लावल्या. पुढच्या वेळी येतील कामाला, असं सांगत त्यांनी पोरांची समजूत घातली.जाता-जाता : सराफकट्ट्यावरनं रंगीबेरंगी भुईनळे आकाशात झेपावू लागले. त्यातल्या काही ‘क्रॅकर्स’मधून वेगवेगळे आवाज येत होते. नेमके काय आवाज येत होते, ते समजलं नाही, पण दिनकरतात्यांना वाटलं की, ‘पेढीवर चला‘, ‘पेढीवर चला’ असा आवाज त्यातनं येतोय! त्यांनी सांगलीवाडीकडनं सराफकट्टा गाठला. गाडगीळांच्या पेढीपुढं चिक्कार गर्दी. ‘सोनं घ्या सोनं... उरलेलं सोनं’ असा बोर्ड पेढीच्या दारात लावला होता. पांढरा सदरा-खाकी चड्डीवाल्यांचा भरणा जास्त होता. तात्या बिरजे, दीपकबाबा, भारतीताई एकेकाला रांगेतनं सोडत होते. नीताताई कट्ट्यावर बसल्या होत्या. ‘माझा क्लेम’... ‘माझा क्लेम’ असं काहीतरी बडबडत होत्या म्हणे! दिनकरतात्या आत घुसले, तोच समोरनं इनामदारांचा शेखर आला. आत एसी केबीनमध्ये बसून सुधीरदादा सगळ्यांना आपट्याची पानं (हेच ते सोनं, बरं का!) देत होते... ‘प्रचाराच्या गडबडीत दसऱ्याचं सोनं द्यायचं राह्यलं. म्हणून आता...’ दिनकरतात्यांच्या लक्षात आलं. ही सगळी इनामदारांच्या शेखरची शाळा! ते मागं फिरले आणि मागच्या दाराला गेले. तिथं दिलीप पैलवानही ‘साथीदारां’ना घेऊन आले होते. दिनकरतात्या आणि पैलवान आत निघाले, तोच इस्लामपूरकरांची गाडी मागच्या बाजूनं बाहेर पडली. गाडीत संजयकाका आणि माधवनगरचे पप्पूशेठही दिसले. दिनकरतात्या आणि पैलवानांनी काय समजायचं ते समजलं. दोघंही आल्या पावली मागं फिरले... आत काही शिल्लक नसणार. हे सोनं इस्लामपूरकरांनी कधीच लुटलं असणार, याची त्यांना पक्की खात्री होती!!

‘त्यांच्या’ केपाही उडाल्या नाहीत!

 

नितीनराजे आणि स्वातीताई, खाड्यांचे सुधाकर, जतच्या कोळेकरांचे भाऊसाहेब आणि त्यांच्यासोबतचे दोघे-तिघे ‘रेल्वे इंजिन’ छाप ‘केपा’ दगडावर उडवत बसले होते. पण ओल्या झाल्यामुळं एक ‘केप’ उडेल तर शपथ! शेवटी त्यांनी तोही नाद सोडून दिला.‘बकरा’ छाप फटाकेयंदा बाजारात ‘बकरा छाप’ फटाके नव्यानं आलेत. मोठा आवाज न होता केवळ ‘फुस्सऽऽ’ असा आवाज त्यातनं येतो म्हणे! सांगलीचे सुरेशअण्णा, शेंडग्यांचे प्रकाशअण्णा, त्यांचे बंधू सुरेश, होनमोरे, सुरेखाताई यांच्याकडं त्या माळा असल्याचं समजलं. आटपाडीचे अमरबापू आणि गोपीचंद, मिरजेचे जाधव मास्तर, जितेंदर, शिराळ्याचे सत्तूभाऊ यांनीही ‘बकरा छाप’ फटाक्यांची आॅर्डर दिल्याचं आता समोर येऊ लागलंय.(‘सरकारनामा’मधील सर्व पात्रं खरी आहेत, कुणाला ती काल्पनिक वाटल्यास निव्वळ योगायोग समजावा.)