शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

हेमंत कुलकर्णी अनंतात विलीन

By admin | Updated: February 4, 2017 01:24 IST

लोकमत’चे सहयोगी समूह संपादक हेमंत दत्तात्रेय कुलकर्णी यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी ११ वाजता नाशिक अमरधाममध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

नाशिक : ‘लोकमत’चे सहयोगी समूह संपादक हेमंत दत्तात्रेय कुलकर्णी यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी ११ वाजता नाशिक अमरधाममध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्येष्ठ कन्या सौ. मुग्धा शहा यांनी कुलकर्णी यांच्या पार्थिवाला अग्निडाग दिला. अंत्यविधीप्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवर नागरिक उपस्थित होते.हेमंत कुलकर्णी यांचे गुरुवारी दुपारी हृदयविकाराने निधन झाले. शुक्रवारी सकाळी कॉलेजरोडवरील पाटीललेन नंबर ४ मधील ‘पुष्कराज’ या निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा निघाली. तत्पूर्वी निवासस्थानी लोकमत समूहाचे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा तसेच लोकमत वृत्तपत्र समूहाचे संपादक दिनकर रायकर यांच्यासह विविध आवृत्त्यांचे संपादक, कैलास मठाचे संविदानंद सरस्वती यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी अंत्यदर्शन घेत कुलकर्णी कुटुंबीयांचे सांत्वन केले. नाशिक अमरधाम येथेही राजेंद्र दर्डा यांनी कुलकर्णी यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करत आदरांजली वाहिली. अंत्यविधीप्रसंगी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर व लोकमत परिवारातील सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)