शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

केईएम रुग्णालयात होणार हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

By admin | Updated: May 17, 2016 03:38 IST

केईएम रुग्णालयामध्ये आता हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे

मुंबई : केईएम रुग्णालयामध्ये आता हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. अशा प्रकारची शस्त्रक्रिया करण्याची परवानगी मिळालेले केईएम हे राज्यातील पहिले रुग्णालय आहे. या शस्त्रक्रियेसाठी आवश्यक पायाभूत सुविधांसाठी आरोग्यसेवा संचालनालयाने केईएमची पाहणी केली आहे. या पाहणीनंतर हात प्रत्यारोपणासाठी रुग्णालयाला परवानगी दिल्याची माहिती मुंबईत विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीने दिली आहे. केईएम रुग्णालयात हात प्रत्यारोपणासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांची तयारी पूर्ण होत आली आहे. गेल्या वर्षी कोचीमध्ये अमृता इन्स्टिट्युट आॅफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटरमध्ये प्रथमच एका व्यक्तीवर यशस्वी हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर, राज्यात प्रथमच मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयाला हात प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी परवानगी मिळाली आहे. येत्या काही दिवसांत दोन्ही हात नसलेल्या व्यक्तींची नावनोंदणी करून प्रतीक्षा यादी तयार करण्यात येणार आहे. दोन्ही हात नसलेल्या व्यक्तींचाच या यादीत समावेश करण्यात येणार आहे. अनेकदा अपघातग्रस्त व्यक्ती गोल्डन अवरमध्ये रुग्णालयात पोहोचू शकत नाही. त्यामुळे या व्यक्तींना हात गमवावे लागतात. आता मात्र केईएममध्ये प्रत्यारोपण करता येणार आहे. कोपराखाली हात तुटला असेल, तर त् प्रत्यारोपण करणे सोपे जाते. तथापि, जन्मत: आजार असलेल्या व्यक्तींच्या हातात दोष असल्यास त्या व्यक्तींवर हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणे शक्य नाही. कारण प्रत्यारोपणासाठी हाताच्या नसा कार्यरत असणे आवश्यक असल्याचे, केईएम रुग्णालयाच्या प्लॅस्टिक आणि रिकंस्ट्रक्टिव्ह विभाग प्रमुख डॉ. विनीता पुरी यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)अपघातात हात गमावलेल्या व्यक्तींना कृत्रिम हात बसविण्याशिवाय अन्य पर्याय नसतो. पण त्या हातांची हालचाल होत नाही. त्यामुळे अनेकदा कृत्रिम हात बसवणे टाळले जाते. पण प्रत्यारोपणानंतर हालचाल शक्य आहे.