शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

वाढदिवशी दिला वंचितांना मदतीचा हात

By admin | Updated: July 23, 2016 04:25 IST

कॅन्सर पेशंट एड असोसिएशनच्या कॅन्सरग्रस्त मुलांबरोबर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला वाढदिवस साजरा केला.

मुंबई : राज्यातील विविध तीस जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले तसेच मुंबईतील कॅन्सर पेशंट एड असोसिएशनच्या कॅन्सरग्रस्त मुलांबरोबर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला वाढदिवस साजरा केला. कॅन्सरग्रस्त मुलांनी मुख्यमंत्र्यांसाठी खास तयार केलेली भेटकार्डे देऊन व केक कापून शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून रुग्णांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मदत करण्यात आली. कॅन्सर पेशंट एड असोसिएशनने या पंधरा मुलांची वर्षा या निवासस्थानी फडणवीस यांची वाढिदवसानिमित्त भेट घालून दिली. यावेळी दोघा मुलींनी मुख्यमंत्र्यांचे औक्षण केले तर लहान मुलांनी केक कापून व स्वत: बनविलेली भेट कार्डे देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी अभिनेता विवेक ओबेरॉय, असोसिएशनच्या कार्यकारी संचालक अनिता पीटर आदी उपस्थित होते. दुपारी विधिमंडळात त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रमातील विद्यार्थिनिंनी मुख्यमंत्र्यांना ओवाळून वाढदिवस साजरा केला. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची ही मुले असून सध्या या आश्रमात शिक्षण घेत आहेत. मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस : मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातर्फे राज्यातील १७ जणांना वैद्यकीय साहाय्यतेच्या धनादेशाचे वितरण फडणवीस यांच्या हस्ते विधिमंडळातील एका छोटेखानी समारंभात झाले. वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख ओमप्रकाश शेटे यांच्या कुटुंबियांनी शीतल सुखदेव गव्हाणे या मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलला आहे. या खर्चाचा एक लाखांचा धनादेश मुख्यमंत्र्यांच्या यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी पर्यटन मंत्री जयकुमार रावल आदी उपस्थित होते. >हॅपी बर्थडे!मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी कॅन्सरग्रस्त मुलांबरोबर आपला वाढदिवस साजरा केला. त्यावेळी फडणवीस यांना केक भरविताना एक मुलगा. सोबत अभिनेता विवेक ओबेरॉय.