बेळगाव, दि. १४ - प्रेम विवाहाला साक्षीदार राहिल्यामुळे मुलीच्या काकाने तरुणांना विवस्त्रकरुन मारहाण केली आहे. अनिल नागरदाळे व त्याच्या एका मित्राने एका तरुणीला २३ सप्टेंबर रोजी प्रेम विवाहाला मदतकेल्याचे कळताच सुरेश धाटगे या प्रोपर्टी डिलरने दोघांना बेळगावी चर्चेकरता बोलवून एका बंदिस्त खोलीत विवस्त्र करून हॉकीस्टिकने बेदम मारहाण केली. तसेच आपल्या एका सहका-याला या मारहाणीची व्हिडीओ क्लिप बनवायला सांगितली. या प्रकरणाची वाच्यता केल्यास हा व्हिडिओ सोशल नेटवर्क साइटवर टाकण्याची धमकीही घाटगे याने दिली. याप्रकरणी पोलिसांनी घाटगेसह इतर सहा जणांना अटक केली आहे.
१० नोव्हेंबर रोजी अनिल नागरदळेच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार नोंदवली होती, परंतू या घटनेकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले होते. अखेरीस अनिलच्या कुटुंबियांनी कर्नाटकमधील पोलिसस्टेशनमध्ये या घटनेची तक्रार नोंदवली असता येथील आयजी भास्कर राव यांनी या प्रकरणाचा शोध घेतला. नागरदळे व त्याचा मित्र हे कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथील रहिवासी आहेत. मारहाणीची व्हिडिओ क्लिप व्हॉट्स अॅप या सोशल नेटवर्क वर प्रसिद्ध झाल्याने या प्रकरणाचा शोध घेणे पोलिसांना अधिक सोपे झाले.