शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांकडून लग्नात मदत

By admin | Updated: May 16, 2016 01:40 IST

तरुणांनी दैनंदिन खर्च कमी करून दुष्काळग्रस्त बीड जिल्ह्यातील मुलीच्या लग्नास एक लाख रुपयांचे साहित्य देऊन मुलीचे लग्न लावले

शिरगाव : येथील तरुणांनी दैनंदिन खर्च कमी करून दुष्काळग्रस्त बीड जिल्ह्यातील मुलीच्या लग्नास एक लाख रुपयांचे साहित्य देऊन मुलीचे लग्न लावले.आई-वडील दुर्धर आजाराने त्रस्त, त्यातच भर म्हणून सलग तीन वर्षांपासून संपूर्ण बीड जिल्ह्यात दुष्काळाचे सावट. त्याच्या झळा या कुटुंबालाही लागलेल्या. अशात मुलगी लग्नाला आलेली. तिचे लग्न कसे करावे हा मोठा प्रश्न कुटुंबाला पडलेला. जमीन आई-वडिलांच्या आजारासाठी पूर्वीच विकलेली. अशा अडचणीत सापडलेल्या बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील कुंभेजळगाव येथील जगन्नाथ उढाण व आशा उढाण यांची व्यथा नंदकुमार जाधव यांना समजली. त्यांनी तत्काळ शिरगाव येथील श्री साईबाबा चॅरिटेबल ट्रस्टमधील त्यांच्या मित्र परिवाराला याबाबत सांगितले. त्या सर्वांनी मिळून या दाम्पत्याच्या सोनाली नावाच्या मुलीच्या लग्नासाठी दोन दिवसांत एक लाख रुपये जमा करून मुलीच्या लग्नासाठी व संसारासाठी लागणारे साहित्य खरेदी करून पाठवून दिले व मुलीचे लग्न लावले. जाधव, मनोज पंडित, नामदेव घाडगे, श्रीकांत घाडगे,अनिल शिंदे, विश्वनाथ यमुल, दिलीप शेजवळ, समाधान हजारे, प्रकाश चिकाने, बद्रिनारायण पाटील यांनी लग्नासाठी पैशाची जमवाजमव केली. त्यातून भांडी, कपडे, कॉट, गादी, पलंग व काही अन्नदानाचे साहित्य अशी खरेदी केली. माझ्या सर्व मित्रांची परिस्थिती अगदी बेताची असताना देखील समाजाचे काही तरी देणे लागतो या उदात्त भावनेने त्यांनी मदत केली. सर्वांनी ही भावना मनात ठेवून काम करावयाचे ठरवल्यास कोणीही अडचणीत सापडणार नाही असे जाधव यांनी सांगितले. आपल्या लग्नासाठी आपल्या वडिलांना मदत केल्याबद्दल या अनोळखी व्यक्तींबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना सोनालीचे अश्रू अनावर झाले. (वार्ताहर)