शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

१० हजारांसाठी अन्य बँकांची मदत

By admin | Updated: June 16, 2017 04:30 IST

खरीप हंगामासाठी तातडीने १० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यासाठी पैसे नाहीत, अशी भूमिका काही जिल्हा बँकांनी घेतलेली असताना त्याचा फटका शेतकऱ्यांना

विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : खरीप हंगामासाठी तातडीने १० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यासाठी पैसे नाहीत, अशी भूमिका काही जिल्हा बँकांनी घेतलेली असताना त्याचा फटका शेतकऱ्यांना बसू नये म्हणून अशा जिल्हा बँकांच्या मदतीसाठी तेथील राष्ट्रीयीकृत आणि व्यावसायिक बँकांची मदत घेण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, त्यादृष्टीने कार्यवाहीदेखील सुरू करण्यात आली आहे. धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, सोलापूर, परभणी, हिंगोली, जालना, बीड, उस्मानाबाद, नांदेड, यवतमाळ, अमरावती, बुलडाणा, नागपूर, वर्धा या १६ बँका आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहेत. शेतकऱ्यांना १० हजारांपर्यंतचे कर्ज देण्यात त्यांना अडचणी आहेत. त्यामुळे त्यांनी अशी असमर्थता व्यक्त केली आहे. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज ‘लोकमत’ला सांगितले की ज्या बँकांना कर्जवाटपात अडचणी आहेत त्यांना स्थानिक जिल्ह्यातील लीड बँका वा राष्ट्रीयकृत/व्यावसायिक बँकांची मदत घेण्यास सांगितले आहे. सहकार विभागाचे अधिकारी त्यासाठी समन्वय साधत आहेत. सर्व कर्जाची थकहमी राज्य सरकारने दिलेली आहे. सर्व शेतकऱ्यांना १० हजारापर्यंतचे कर्ज मिळेल. त्यासाठी विविध सहकारी सोसायट्या या एजन्ट म्हणून काम करतील त्यांना त्याचे कमिशन दिले जाईल. सुलभी पीक कर्ज योजना असे या योजनेला नाव दिले असून शेतकऱ्यांचे मेळावे घेऊन कर्जाचे फॉर्म गोळा करण्यात येतील. या कर्जासाठी शेतकऱ्यांनी प्रतिज्ञापत्र भरण्याची आवश्यकता नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. नोकरदार, आमदार, खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, निवृत्तीवेतनधारक व्यक्ती, करदाते, डॉक्टर, वकील, कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी साखर कारखाना, सहकारी सुतगिरणी, नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, सहकारी दूध संघ यांचे संचालक आणि या संस्थांचे अधिकारी, कामगार यांना हे कर्ज मिळणार नाही.- १० हजार रुपयांचे कर्ज देण्यासाठी श्रीमंत व्यक्ती, करदाते यांना वगळण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून तसे शपथपत्र घेतले जात आहे. मात्र आता शपथपत्राची सक्ती नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुण्यात सांगितले.