शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

समाजाच्या शेवटच्या घटकार्पयत मदत

By admin | Updated: August 9, 2014 23:23 IST

रसिकलाल धारिवाल यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आर. एम. फाउंडेशनच्या वतीने शिरूर, श्रीगोंदा व पारनेर अशा तीन तालुक्यांतील 75 शाळांना पुस्तके व ग्रंथालय कपाटांचे वाटप करण्यात आले.

शिरूर :  रसिकलाल धारिवाल यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आर. एम. फाउंडेशनच्या वतीने शिरूर, श्रीगोंदा व पारनेर अशा तीन तालुक्यांतील 75 शाळांना पुस्तके व ग्रंथालय कपाटांचे वाटप करण्यात आले. अमृतमहोत्सवानिमित्त फाउंडेशनने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविताना समाजाच्या शेवटच्या घटकार्पयत पोहोचण्याचा प्रयत्न केला असल्याचे फाउंडेशनच्या उपाध्यक्षा शोभाताई धारिवाल यांनी सांगितले.
रामलिंग (शिरूर ग्रामीण) येथे शोभाताई धारिवाल सभामंडपात रसिकलाल धारिवाल व शोभाताई यांच्या हस्ते शाळांना पुस्तके व कपाटांचे वाटप करण्यात आले. 
1 लाख झाडे लावण्यात आल्याचे सांगून शोभाताई म्हणाल्या, फाउंडेशनतर्फे 2क्क्6 पासून दर वर्षी आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांतील हुशार विद्याथ्र्याना एक कोटीर्पयत शिष्यवृत्ती वाटपही केले जाते. या वेळी विद्याधाम प्रशलेचे अध्यक्ष चंद्रकांत बाफना, गोडोजी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भानुजी कर्नावत, फाऊंडेशनचे विश्वस्त सतीश धारिवाल, पांजरपोळचे अध्यक्ष रमणलाल बोरा आदी मान्यवर उपस्थित होते. शिरूर शहर विकास आघाडीचे नेते माऊली पठारे, उद्योगपती किशोर खाबिया यांनी मनोगत व्यक्त केले. 
वाघाळ्याचे माजी सरपंच कुंडलिकराव थोरात, सरदवाडीचे माजी सरपंच विलास कर्डिले, रामलिंग देवस्थानचे विश्वस्त घावटे, खजिनदार किसनराव खेडकर, सुभाष गांधी, विनोद धारिवाल आदी उपस्थित होते. मातोश्री मदनबाई धारिवाल रुग्णालयाचे व्यवस्थापक अंबरिश सूर्यवंशी यांनी प्रस्ताविक केले, सहायक व्यवस्थापक डॉ. शेखर जगताप यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक प्रतिनिधींतर्फे प्रा. जाधव, रामराव पवार यांनी धारिवाल दाम्पत्यांच्या  दातृत्वाबद्दल त्यांचे ऋण व्यक्त केले. (वार्ताहर)
 
आरोग्य शिबिरातून रूग्णांना दिलासा
या वेळी बोलताना शोभाताई म्हणाल्या, धारिवाल यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त 1 मार्च 2क्13 पासून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. 16 फेब्रुवारी 2क्14 ला घेण्यात आलेल्या  महारक्तदान शिबिरात रक्तदात्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे 26 हजार रक्तबॅगा जमा होऊ शकल्या. डॉ. लहाने व डॉ. रागिणी पारेख यांच्या मार्गदर्शनाखाली 21क् जणांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या. कृत्रिम अवयव व कृत्रिम नेत्र प्रत्यारोपण मोफत शिबिरात 1क्क् हून अधिक रुग्णांना याचा फायदा मिळाला. प्लॉस्टिक व कॉस्मेटिक सजर्रीचे मोफत शिबिर, वंध्यत्व निवारण आदी शिबिरांच्या माध्यमातून रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला.