शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कापूस, सोयाबीन उत्पादक शेतक-यांना मिळणार मदत

By admin | Updated: June 12, 2016 02:33 IST

पीक विमा न काढलेल्या अमरावती विभागातील शेतक-यांचा समावेश.

संतोष येलकर/अकोला राष्ट्रीय कृषी पीक विमा काढला नाही, अशा कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना दुष्काळी परिस्थितीत पीक विमा रकमेच्या ५0 टक्के मदत शासनामार्फत दिली जाणार आहे. त्यामध्ये अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांतील पीक विमा न काढलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांचा समावेश असून, विमा न काढलेल्या शेतकर्‍यांच्या याद्या तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांकडून तहसीलदारांना देण्यात आले आहेत.गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, राज्यातील विविध जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. दरम्यान, गतवर्षीच्या खरीप हंगामात राष्ट्रीय पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा काढलेल्या शेतकर्‍यांपैकी पीक नुकसानभरपाईपोटी पात्र शेतकर्‍यांसाठी पीक विम्याची रक्कम मंजूर करण्यात आली. पीक विम्याची प्राप्त रक्कम संबंधित शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्याच्ी प्रक्रिया सुरू आहे. दुष्काळी परिस्थितीत पीक विमा योजनेंतर्गत विमा उतरविलेल्या शेतकर्‍यांना पीक नुकसानभरपाईच्या रकमेचा लाभ मिळत असला, तरी गतवर्षी ज्या शेतकर्‍यांनी पीक विमा काढला, अशा शेतकर्‍यांना दुष्काळी परिस्थितीत दिलासा देण्यासाठी पीक विम्याच्या ५0 टक्के रकमेची मदत देण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला आहे. त्यामध्ये अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाच जिल्ह्यांतील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांचा समावेश आहे. त्यानुसार विभागातील पाचही जिल्ह्यांतील कापूस व सोयाबीन पिकाचा विमा न काढलेल्या शेतकर्‍यांना पीक विम्याच्या ५0 टक्के मदतीची रक्कम शासनामार्फत देण्यात येणार आहे. त्यासाठी गतवर्षी पीक विमा न काढलेल्या शेतकर्‍यांची माहिती सादर करण्याचे निर्देश शासनामार्फत जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहेत.

शेतक-यांच्या याद्या तयार करा; जिल्हाधिका-यांचे निर्देश!गतवर्षी पीक विमा काढलेल्या व पीक विमा न काढलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांच्या याद्या तयार करून तातडीने सादर करण्याचे निर्देश अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत जिल्हाधिकार्‍यांकडून तहसीलदारांना ९ जून रोजी देण्यात आले आहेत. याद्या तयार झाल्यानंतर पीक विमा न काढलेल्या शेतकर्‍यांची माहिती जिल्हाधिकार्‍यांमार्फत शासनाकडे सादर करण्यात येणार आहे.