शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दंडाची रक्कम शेतकऱ्यांच्या मदतीसाठी

By admin | Updated: February 27, 2016 04:48 IST

बेकायदेशीर होर्डिंगप्रकरणी भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, विलेपार्लेचे आमदार पराग अळवणी, मनसेचे कार्यकर्ते सचिन गुंजाळ व भाजपाच्या पक्ष कार्यकर्त्यांनी उच्च न्यायालयाची

मुंबई : बेकायदेशीर होर्डिंगप्रकरणी भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, विलेपार्लेचे आमदार पराग अळवणी, मनसेचे कार्यकर्ते सचिन गुंजाळ व भाजपाच्या पक्ष कार्यकर्त्यांनी उच्च न्यायालयाची बिनशर्त माफी मागत दंडापोटी ३ लाख ६० हजार रुपये न्यायालयाकडे सुपुर्द केले. ही रक्कम शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पाठवण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या वकिलांना दिले.बेकायदेशीर होर्डिंग झळकल्याने न्या. अभय ओक व न्या. सी. व्ही. भडंग यांच्या खंडपीठाने १८ फेब्रुवारी रोजी आशिष शेलार, आमदार पराग अळवणी आणि मनसेचे कार्यकर्ते व विकासक सचिन गुंजाळ यांना स्टेट्सला शोभेल असाच दंड भरण्याचे निर्देश दिले. तर भाजपाच्या १२ पक्षकार्यकर्त्यांना २० हजार रुपये दंड भरण्याचे आदेश दिले. त्यानुसार आशिष शेलार यांनी १.७० लाखांचा धनादेश मुख्यमंत्री साहाय्यता निधीच्या नावे दिला. याशिवाय २५ हजार रुपये मुंबई महापालिकेच्या नावे जमा केले. महापालिकेला होर्डिंग हटवण्यासाठी आलेल्या खर्चाची भरपाई म्हणून ही रक्कम महापालिकेला देण्यात आली. तर आमदार पराग अळवणी यांनी ४० हजार रुपये व सचिन गुंजाळ यांनी २५ हजार रुपयांचा धनादेश नाम फाउंडेशनच्या नावे जमा केला. त्याशिवाय अन्य पाच कार्यकर्त्यांनीही २० हजार रुपयांचा धनादेश नाम फाउंडेशनच्या नावे जमा केला. बेकायदेशीर होर्डिंग लावण्याऱ्यांना सक्त ताकीद दिली असून, जे कार्यकर्ते बेकायदेशीरपणे होर्डिंग लावतील त्यांना पक्षातून तत्काळ निलंबित करण्यात येईल, अशी माहिती शेलार यांच्या वकिलांनी खंडपीठाला दिली. दरम्यान, याचिकाकर्त्यांचे वकील उदय वारुंजीकर यांनी ना. म. जोशी मार्गावर मोनो रेल्वेच्या २०-२५ खांबांवर किमान २० होर्डिंग लावल्याची माहिती खंडपीठाला दिली. त्यावर खंडपीठाने होर्डिंग लावणाऱ्यांची यादी देण्याचे निर्देश दिले. त्यावर शिवसेनेच्या वकिलांनी बेकायदेशीर होर्डिंग पुन्हा लावण्यात येऊ नये, यासाठी पक्षांतर्गत यंत्रणा निर्माण करणार असल्याची माहिती खंडपीठाला दिली. त्यावर खंडपीठाने होर्डिंग लावणाऱ्यांकडून २५ हजार रुपये दंड जमा करून सादर करण्याचे निर्देश शिवसेनेला दिले. तसेच काही दिवसांपूर्वीच नव्याने होर्डिंग लावणाऱ्या ४७ जणांनाही उच्च न्यायालयाने २५ हजार रुपये दंड ठोठावला. शरद पवार, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, राहुल गांधी व अन्य बड्या नेत्यांना शुभेच्छा देणाऱ्या होर्डिंग्जचा समावेश आहे. (प्रतिनिधी) ‘कार्यकर्त्यांची नावे द्या, अवमानाची कारवाई करू’बेकायदेशीर होर्डिंग उतरवण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह जाणाऱ्या पोलीस शिपायाला रिपाइंच्या कार्यकर्त्यांना मारल्याची बाब अ‍ॅड. वारुंजीकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणली. यावर या कार्यकर्त्यांची नावे द्या, आम्ही त्यांच्यावर अवमानाची कारवाई करू, असे खंडपीठाने म्हटले. सातारा येथील सुस्वराज्य फाउंडेशनने बेकायदेशीर होर्डिंगबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.