शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्तांना आठवडाभरात मदत

By admin | Updated: November 20, 2014 02:41 IST

केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या निकषानुसार दुष्काळग्रस्त भागातील प्रत्येक शेतात जाऊन पंचनामे करण्याची अट शिथिल करण्याची राज्य सरकारची मागणी केंद्र सरकारने मान्य केली आहे.

मुंबई : केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या निकषानुसार दुष्काळग्रस्त भागातील प्रत्येक शेतात जाऊन पंचनामे करण्याची अट शिथिल करण्याची राज्य सरकारची मागणी केंद्र सरकारने मान्य केली आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्तांना मदत मिळण्यास आता दोन महिन्यांऐवजी जेमतेम आठवडा लागेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी व्यक्त केला.भाजपाच्या सदस्य नोंदणी मोहिमेचा आरंभ फडणवीस यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते म्हणाले की, दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्यावर आतापर्यंत पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असल्याचे जाहीर न करण्याकडे मागील राज्यकर्त्यांचा कल राहिला होता. मात्र या वेळी आमच्या सरकारने वस्तुनिष्ठ आकडेवारी सादर करण्यास सांगितले. त्यामुळेच महाराष्ट्रातील १९ हजारांहून अधिक गावे दुष्काळाच्या छायेत असल्याचे गंभीर चित्र दिसत आहे. आता केंद्राकडे मदतीकरिता सरकारचे निवेदन जाईल. त्यानंतर सरकारचे पथक येऊन प्रत्येक शेतीचे पंचनामे करील, अशी अट होती. मात्र लोकांना तत्काळ दिलासा देण्याकरिता अट काढून टाकण्यात आली आहे. मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली तेव्हा १७०० मे. वॅट वीजनिर्मितीचे प्रकल्प कोळशाअभावी बंद होते आणि २००० मे. वॅट वीजनिर्मितीचे प्रकल्प बंद पडण्याच्या मार्गावर होते. केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी तातडीने कोळसा उपलब्ध करून दिल्यामुळे ग्रामीण भागातील दोन तासांचे लोडशेडिंग बंद झाले आहे, याकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनी लक्ष वेधले. राज्यातील आठ जिल्ह्यांतील २,५०० ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाले होते व बदलण्याकरिता एकही ट्रान्सफॉर्मर उपलब्ध नव्हता. त्यामुळे अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र उद्यापासून ट्रान्सफॉर्मरचा साठा येत असून ते बदलण्यास सुरुवात झाली आहे, असे ते म्हणाले.